शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गंभीरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 19:26 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गंभीरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर समृद्धी महामार्गामध्ये गेली असून सदर विहिरीच्या लगत असलेला आजूबाजूचा भूखंड खोदकाम केल्याने विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचले असल्यामुळे जवळपास अंदाजे चौदाशे ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या गंभीरवाडी ग्रामस्थांना मॅहनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात संघर्ष करावा लागत आहे.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गंभीरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर समृद्धी महामार्गामध्ये गेली असून सदर विहिरीच्या लगत असलेला आजूबाजूचा भूखंड खोदकाम केल्याने विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचले असल्यामुळे जवळपास अंदाजे चौदाशे ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या गंभीरवाडी ग्रामस्थांना मॅहनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात संघर्ष करावा लागत आहे.केवळ समृद्धी महामार्गाच्या खोदकाम कामकाजामूळे येथील सार्वजनिक विहिरीवरचा ग्रामस्थांसाठी असलेला रस्ता बंद झाला व सदर खोदलेल्या भागामुळे खड्ड्यातील विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी या ग्रामस्थांना मिळत नाही.तसेच ग्रामपंचायत ने केलेल्या पर्यायी मार्गाने जवळपास चार किलोमीटर दूर अंतरावरून सुविधा केलेले पाणी तीन चार दिवसानंतर येथील वाडीतील पाण्याच्या टाकीत येते परंतु सदर पाण्याची देखील दुरवस्था झालेली असल्याने येथील ग्रामस्थांना ते पाणी सुद्धा गढूळ स्थितीत मिळत आहे.परिणामी येथील ग्रामस्थ याच पाण्यावर अवलंबून आहेत.स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी यांनी देखील या प्रश्नाकडे कानाडोळा केला आहे.तरी ही पिण्याच्या पाण्याची सुविधा व हा मूलभूत प्रश्न स्थानिक प्रशासनाने व लोप्रतिनिधी यांनी लवकरात सोडवावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.प्रतिक्रि या :चालू वर्षी सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असतांना भर उन्हाळ्यात आमच्या ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष केलीच परंतु ऐन पावसाळ्यात देखील आम्हांला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर याच्या सारखं दुसरं दुर्दैव कुठलं समजावं.आता तरी हा तीव्र ज्वलंत प्रश्न सोडवावा अशी आमची प्रमुख मागणी आहे.- जगदीश डगळे (ग्रामस्थ गंभीरवाडी)फोटो : समृद्धी महामार्गाच्या खोदकामामुळे गंभीरवाडीतील सार्वजनिक विहिरीत साचलेले पावसाचे गढूळ पाणी तर दुसर्या छायाचित्रात समृध्दी महामार्गाचे झालेले खोदकाम.(फोटो स्वतंत्र पाठवतो.)