शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएं’चे खरे नाही!

By admin | Updated: June 18, 2014 01:00 IST

‘पीएं’चे खरे नाही!

सरकार बदलते, धोरणे बदलतात, ती राबविणारे मंत्रीही बदलतात, पण सत्तेच्या परिघात कायम राहतात, ती मंत्र्यांची ‘पीए’ म्हणजे स्वीय सहाय्यक मंडळी. वर्षानुवर्षांपासून राज्यांमध्ये काय किंवा केन्द्रामध्ये काय, हीच स्थिती. मंत्री जुना असेल तर आपल्या जुन्या सहकाऱ्यांना म्हणजे पीएंना सोडीत नाही आणि नवा असेल तर, बुजुर्गांचे मार्गदर्शन घेऊन तरबेजांना जवळ करतो. याची कारणे बहुधा हीच असावीत की, सरकारी कारभारातील गुंतागुंत आणि क्लिष्टता भोवळ आणणारी ठरत असल्याने, सरकारी कारभार चालविण्यासारख्या अनुत्पादक बाबींमध्ये लक्ष घालून मेंदू शिणविण्यापेक्षा मंत्र्यांना त्याहून महत्वाच्या आणि उत्पादक गोष्टींमध्ये लक्ष घालणे श्रेयस्कर वाटत असावे. त्याचा परिणाम मग एकच घडून येतो. पीए मंडळीच मंत्र्यासारखे वागू लागतात. आपले स्वतंत्र हितसंबंध निर्माण करतात. मंत्र्याच्या नावाने वाट्टेल ते उद्योग करतात आणि पुन्हा करुन सवरुन नामानिराळे होतात. ही बाब सरकारच्या कधी लक्षातच आली नाही असे नव्हे, विलंबाने का होईना ती आली आणि चार वर्षांपूर्वी केन्द्र सरकारने एक अध्यादेशच जारी केला. या अध्यादेशानुसार ज्या स्वीय सहाय्यकांनी एकत्रितपणे सलग दहा वर्षे कोणत्या ना कोणत्या मंत्र्याची सेवा केली असेल, त्याची रवानगी सरळ त्याच्या मूळ खात्यात करावी आणि नव्या लोकाना संधी द्यावी. पण या अध्यादेशाकडे सर्व मंत्र्यांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. नव्याने सत्तारुढ झालेल्या मोदी सरकारने आणि खरे तर स्वत: पंतप्रधान मोदी यांनी मात्र तोच अध्यादेश नव्याने जारी करुन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सक्तीच केली आहे. परंतु तितकेच नाही तर मोदींनी आपल्या मंत्र्यांवर आणखीदेखील काही ‘जाचक’ निर्बन्ध लागू केले आहेत. त्यात नातलगांना पीए नेमू नये, व्यापारधंद्यात भागीदारी करु नये, नातलगांना परदेशात नोकऱ्यांना पाठवू नये, अशा काही बाबी आहेत. नव्या मंत्र्यांनाही त्या जाचक ठरु लागल्याने त्यांनी रदबदलीचा प्रयत्न करुन पाहिला खरा, पण अजून तरी त्यांची डाळ शिजलेली नाही. - मनकवडा