आजवर हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली व आंदोलनही केली, मात्र आजपर्यंत या रस्त्याचा विषय काही मार्गी लागला नाही. त्यामुळे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. पण कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण उपोषणास बसू नये असे इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सांगितले व १५ दिवसांत संपूर्ण रस्ता दुरुस्त केला जाईल व नवीन रस्ता मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर जनसेवा प्रतिष्ठानने उपोषण मागे घेतले.
याप्रसंगी जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरीचे किरण फलटणकर, रामानंद बर्वे, जालिंदर मानवेढे, प्रमोद पाठक, कृष्णा करवा, दिलीप नरवडे, सागर परदेशी, कृष्णा परदेशी, विजय गुप्ता, सुमित बोधक, डाॅ. प्रदीप बागल, अजित पारख, प्रकाश नावंदर, योगेश भारती, सुनील आहेर, प्रथमेश पुरोहित, अविनाश भरिंडवाल, राजेश जैन, अस्लम शेख, रहिम शेख, मेहमूद सय्यद आदी उपस्थित होते. (१८ घोटी ३)
180821\18nsk_34_18082021_13.jpg
१५ दिवसात रस्ता दुरुस्त करण्याची प्रशासनाची ग्वाही