शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

निविदाप्रक्रियेतच अडकला खतप्रकल्प

By admin | Updated: April 30, 2015 00:20 IST

चौथ्यांदा काढली निविदा : प्रकल्प चालविण्यासाठी ठेकेदारच मिळेना

नाशिक : महापालिकेच्या मरणासन्न स्थितीत असलेल्या खतप्रकल्पाच्या अवस्थेसंबंधी महासभेत वारंवार गळे काढले जात असतानाच खतप्रकल्प चालविण्यास देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या निविदाप्रक्रियेला ठेकेदारांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. एकीकडे शासन पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देत नाही आणि दुसरीकडे ठेका घेण्यासही कुणी पुढे येत नाही, अशा कात्रीत सापडलेल्या प्रशासनाला येत्या सिंहस्थ काळात कचऱ्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेचा खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जात नसल्याने सध्या प्रकल्पावर कचऱ्याचे मोठे ढिगारे साचलेले आहेत. त्यातच प्रकल्पावरील अनेक मशिनरीच्या देखभाल-दुरुस्तीबाबत प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे. खतप्रकल्पावर पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध नसल्याने प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे. सध्या खतप्रकल्पावर केवळ ४८ कर्मचारी कार्यरत असून, सुमारे १२५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. खतप्रकल्पावर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे भरतीप्रक्रिया राबविण्याकरिता परवानगी मागितली होती; परंतु शासनाने भरतीस नकार दिल्याने प्रशासनाकडून उपलब्ध मनुष्यबळावर प्रकल्प कसातरी पुढे चालविला जात आहे. खतप्रकल्पावर दररोज सुमारे ३७५ टन कचरा येत असतो; परंतु काही तासांपुरताच प्रकल्प चालविला जात आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. खतप्रकल्पाच्या दुरवस्थेसंबंधी प्रभाग समित्यांपासून महासभेपर्यंत सदस्यांकडून प्रशासनाला वारंवार धारेवर धरले जाते.