शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:19 IST

नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या दोन ...

नाशिक : आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या दोन बरगड्या तुटल्याचे शवविच्छेदनादरम्यान समोर आल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या घातपाताचा संशयालाही बळ मिळाले असून, डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या बरगड्या कशा तुटल्या, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केलेला असतानाच शवविच्छेदनादरम्यान डॉ. शिंदे यांच्या छातीच्या पिंजऱ्याच्या दोन बरगड्या तुटलेल्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या घातपाताच्या संशयाला बळ मिळाले आहे. मात्र बरगड्या तुटून हृदय किंवा फुप्फुसासारख्या अंतर्गत भागापर्यंत कोणतीही जखम आढळून आलेली नाही. त्यामुळे ही जखम आयसीयूतील अंतर्गत उपचारादरम्यान झाली असल्याची शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस तपासात काय वास्तव समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सुरुवातीला ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली होती. परंतु, त्यांच्या वडिलांनी डॉ. स्वप्निल यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर दोन महिला साथीदारांकडून त्याचा वारंवार छळ होत असल्याची तक्रार करीत संबंधित दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी संशयित महिला डॉक्टरांसह वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे चौकशी सुरू केली असली तरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

-

व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबला पाठवला

स्त्रीरोगतज्ज्ञ विभागात एमडी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात असलेले डॉ. स्वप्निल यांचा मृतदेह महाविद्यालयातील ऑपरेशन थिएटरलगत असलेल्या वॉशरूममध्ये आढळून आल्याने त्यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र आता शवविच्छेदनातून समोर आलेल्या संशयास्पद बाबींमुळे डॉ. स्वप्निल शिंदे यांच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या शवविच्छेदनाचा व्हिसेरा जिल्हा शासकीय रुग्णालयाने पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे.