शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंचासह तिच्या पतीच्या खूनप्रकरणी आरोपीस दुहेरी जन्मठेप

By admin | Updated: March 20, 2017 22:30 IST

दोन वर्षांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील नितळीपाडा येथील वृद्ध महिला सरपंच सरूबाई जयराम गवळी व तिचा पती जयराम ठमा गवळी यांची संशयावरून कोयता तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून

नाशिक : दोन वर्षांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील नितळीपाडा येथील वृद्ध महिला सरपंच सरूबाई जयराम गवळी व तिचा पती जयराम ठमा गवळी यांची संशयावरून कोयता तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून करणारा आरोपी किसन नामदेव गवळी (रा़ नितळीपाडा, ता़ दिंडोरी, जि़ नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी सोमवारी (दि़२०) दुहेरी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, जयराम गवळी हे रात्रीच्या वेळी आरोपी किसन गवळीच्या घराजवळ फिरत होते़ याचा राग येऊन तू माझ्या घरी का आला, अशी कुरापत काढून आरोपी किसन गवळी याने जयराम गवळीचा पाठलाग करून कोयत्याने वार करून व दगडाने ठेचून खून केला़ यानंतर सरपंच सरूबाई हिच्यावरही कोयत्याने वार करून ठार मारले़ या घटनेची माहिती आरोपीनेच रहिवाशांना दिली मात्र पोलिसांना सांगितलेच नाही़दुसऱ्या दिवशी जयराम गवळी यांचा मृतदेह एका नाल्यात आढळून आल्याने दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला होता़ या खुनाच्या तपासात किसन गवळीस अटक करण्यात आली, तसेच त्याच्याकडून रक्ताचे डाग असलेले कपडेही जप्त करण्यात आले होते़ आरोपी गवळीच्या घराजवळ राहणारे निवृत्ती व लक्ष्मण पाडवी यांचे जबाबही घेण्यात आले होते़जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदेश्वर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ यामध्ये सरकार वकील गायत्री पटणाला यांनी सहा साक्षीदार तपासून न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर केले़ यामध्ये न्यायालयाने आरोपी किसन गवळी यास दुहेरी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़