शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्क दावे निपटाऱ्यात नाशिक राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:38 IST

नाशिक : आदिवासींनी अतिक्रमित केलेली वनजमीन ताब्यात देणाºया वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्णात तीन समित्या तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७०० दाव्यांना मंजुरी दिली जात आहे.

ठळक मुद्देमहिनाअखेर २१ हजार प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी जिल्ह्णातील महसूल यंत्रणा युद्धपातळीवर काम

श्याम बागुल।नाशिक : आदिवासींनी अतिक्रमित केलेली वनजमीन ताब्यात देणाºया वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्णात तीन समित्या तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७०० दाव्यांना मंजुरी दिली जात आहे.दहा वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांचे काम अतिशय संथगतीने सुरू होते. आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जागेचा ताबा मिळण्यासाठी किसान सभेतर्फे ६ मार्चला नाशिक येथून मंत्रालयावर लाँग मार्च काढण्यात आला होता. हजारो आदिवासी महिला व पुरुषांचा हा मोर्चा पायी चालत १२ मार्चला मुंबईत पोहोचला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांत दावे निकाली काढण्याचे आश्वासन मोर्चेकºयांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार ६ सप्टेंबर रोजी मुदत संपली असली तरी, महिनाअखेर २१ हजार प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी जिल्ह्णातील महसूल यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.पाच महिन्यांत जेमतेम सात हजार दावे निकाली निघाले. उर्वरित दाव्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी असलेली एकच जिल्हास्तरीय समितीचे विकें्रदीकरण करण्यात आले असून, त्याची जबाबदारी नाशिक व मालेगावच्या अपर जिल्हाधिकाºयांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्हास्तरीय समितीकडे आलेल्या दाव्यांना मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. परंतु ११ हजार दाव्यांची फेरसुनावणी ‘स्यु मोटो’ घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे जे दावे अमान्य करण्यात आले, त्यांची सुनावणी करण्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकाºयांची नेमणूक केली आहे.महिन्यात १३ हजार दावे निकाली काढणारदहा दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी नाशिकला येऊन आढावा घेतला होता. त्यात १३ हजार दाव्यांचा निपटारा एका महिन्यात करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दररोज उपविभाग व जिल्हास्तरावर ७०० दाव्यांवर निर्णय घेतला जात आहे. राज्यातील २६ जिल्ह्णांमध्ये सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता, नाशिक अव्वल ठरला आहे.