शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकाऱ्यांच्या सचोटीवर संशय

By admin | Updated: June 29, 2015 23:28 IST

महसूल अधिकाऱ्यांच्या सचोटीवर संशय

नाशिक : राज्यात महसूल विभागात कार्यरत असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची डोळे दिपवून टाकणारी बेनामी मालमत्ता, भू-माफिया, वाळूमाफियांशी असलेले साटेलोटे व निर्माण झालेले राजकीय हितसंबंध पाहता, अशा अधिकाऱ्यांची सचोटी तपासण्याचा निर्णय राज्याच्या महसूल व वन मंत्रालयाने घेतला असून, त्यासाठी नायब तहसीलदार ते थेट अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची गोपनीय माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. शासनाच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात असली तरी, काही अधिकाऱ्यांनी ‘कर नाही त्याला डर कशाला’ अशी भूमिका घेतली आहे, तर काहींच्या मते शासन अशा प्रकारे अधिकाऱ्यांची माहिती गोळा करून त्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता नाकारू शकत नाही, असे म्हटले आहे. मात्र असे काहीही असले तरी, शासनाने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी तेथे नेमलेल्या अधिकाऱ्यांची सचोटी तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ज्या अधिकाऱ्याला यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे अशांची माहिती गोळा करणे, तसेच ज्यांनी उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक म्हणजेच बेनामी संपत्ती गोळा केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, अशांची यादी तयार करण्यात येत आहे. याशिवाय ज्या अधिकाऱ्यांचे कार्यालयातच संशयास्पद वर्तन असेल म्हणजेच कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची त्याच्या विरुद्ध तक्रार असेल किंवा शासनाकडून कोणत्याही प्रकरणात चौकशी सुरू असेल, शासकीय कामकाज करताना अनियमितता केल्याचा ठपका किंबहुना विभागीय चौकशीचा प्रस्ताव असेल तर अशांचीही माहिती मागविण्यात आली आहे. कार्यालयात लैंगिक छळाची वा कर्मचाऱ्यांकडून पैशांची अपेक्षा ठेवल्याची तक्रार असलेल्या अधिकाऱ्यांचीही माहिती गोळा करण्यात येत आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या सचोटीवर संशय घेणाऱ्या शासनाने मात्र अशा प्रकारची माहिती गोळा करण्याचे काम महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांवरच सोपविली आहे. त्यात उपविभागीय अधिकारी त्यांच्या अखत्यारितील नायब तहसीलदार, तहसीलदारांची गोपनीय माहिती गोळा करतील, तर उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकाऱ्यांबाबतची माहिती खुद्द जिल्हाधिकारी शासनाला सादर करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांबाबतची माहिती मात्र विभागीय आयुक्त एकत्रित करून शासनाला देतील, अशी सूचना शासन आदेशात देण्यात आलेली आहे.