शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरच्या दुहेरी हत्त्याकांडाचा उलगडा

By admin | Updated: April 21, 2016 00:13 IST

सातपूरच्या दुहेरी हत्त्याकांडाचा उलगडा

नाशिक : शिवाजीनगरजवळील कार्बन नाक्याच्या मागे सोमवारी पहाटे उघडकीस आलेल्या पल्लवी संसारे (३२) व विशाल संसारे (६) या माय-लेकाच्या निर्घृण हत्त्येचा उलगडा झाला असून, घरमालकाचा मुलगा संशयित रामदास रंगनाथ शिंदे यास पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत उपायुक्त धिवरे यांनी सांगितले की, कचरू संसारे हा गत चार वर्षांपासून रंगनाथ शिंदे यांच्या खोलीमध्ये भाडेतत्त्वावर राहतो़ चार दिवसांपूर्वी संसारे कुटुंबीय माहेरी गेले होते़ रविवारी (दि़१७) कचरू संसारे यांना रात्रपाळी असल्याने हे सर्व दुपारी नाशिकला आले़ संसारे हे ड्यूटीवर गेल्यानंतर रात्री बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास घरमालकाचा मुलगा रामदास शिंदे याने आतील दरवाजा उघडून घरात प्रवेश केला़ यानंतर पल्लवी संसारे यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिकार केल्याने शिंदे याने त्यांच्यावर धारदार हत्याराने सुमारे २० ते २५ वार केले़ तर आईच्या आवाजाने जाग आलेल्या विशालवर सुमारे १५ वार केले़ यामध्ये या माय-लेकाचा मृत्यू झाला़संशयित रामदासने घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला़ यानंतर तो रात्रभर विल्होळी नाका, सीबीएस या ठिकाणी फिरत होता़ सकाळी एक्सलो पॉइंटजवळील पंचरत्न हॉटेलमध्ये शिंदे बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्यास अटक केली़ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शिंदेला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ बुधवारी त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे़ (प्रतिनिधी)