शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बससेवेला लवकरच ‘डबल बेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

दरम्यान, बैठकीत अधिकृत मुहूर्त काहीही ठरला तरी किमान पाच मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास ...

दरम्यान, बैठकीत अधिकृत मुहूर्त काहीही ठरला तरी किमान पाच मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

नाशिक महापालिकेने २०१८ मध्ये शहर बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कंपनीने काम सुरू झाले असले तरी अनेक अडचणी येत गेल्याने बससेवा लांबत गेली. गेल्यावर्षी २६ जानेवारीस महापालिकेने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी शासनाकडून बस संचलनाचा परवानाच मिळाला नसल्याचे आढळले होते. त्यानंतर परवाना मिळाला आणि कंपनीच्या बसेसदेखील मार्च महिन्यात दाखल झाल्या. त्याचे पासिंगही झाले. परंतु कोरोनाचे संकट उद्‌भवले आणि पुन्हा हा विषय मागे पडला. शासनाचा परवाना येऊनदेखील महापालिकेच्या बससेवेसाठी दरनिश्चितीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक होत नव्हती. अखेरीस गेल्या आठवड्यात त्यांनी दोन किलोमीटरला दहा रुपये याप्रमाणे दर आकारणीस मान्यता दिली. त्यामुळे आता बऱ्यापैकी बससेवेला चालना मिळण्याची शक्यता आहे.

एकीकडे बससेवेची संपूर्ण तयारी झाली असताना दुसरीकडे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. त्यातच राज्य शासनाने आता मिशन अनलॉक सुरू केले आहे. बाधितांच्या संख्येच्या निकषावर सोमवारपासून राज्यात अनेक ठिकाणी अनलॉक करण्यात येणार आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातदेखील शिथिलता मिळणार असल्याने बससेवा सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

इन्फो...

गेल्यावर्षी बससेवेची तयारी करताना महापालिकेने नऊ मार्ग निश्चित केले होते. त्यावर प्रथम बससेवा सुरू होणार होती, मात्र आता पाच मार्ग निवडण्याची शक्यता असून, त्यावर ही सेवा चाचणी स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे.

कोट...

महापालिकेने बससेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. बुधवारी (दि.९) बैठक घेण्यात येणार असून, त्यात निर्णय होणार आहे. सुरुवातीला पाच ते सहा मार्गांवर बससेवेची चाचणी घेण्यात येईल आणि प्रवाशांचा प्रतिसाद असलेल्या मार्गांवर पन्नास बस सुरू करण्याचे नियोजन आहे.

- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका