शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

वाडीवऱ्हे दरोड्याचा छडा

By admin | Updated: March 23, 2017 22:51 IST

नाशिक : लुटीची घटना रविवारी साडेअकराच्या सुमारास घडली होती. या दरोड्याचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

नाशिक : एका विदेशी कंपनीच्या मद्याची वाहतूक करणारा आयशर ट्रक अडवून लुटीची घटना रविवारी (दि. ५) साडेअकराच्या सुमारास घडली होती. या दरोड्याचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिंडोरी येथून एका विदेशी कंपनीच्या मद्याच्या बाटल्या असलेले खोके आयशर ट्रकमधून (एमएच ४१ जी. ७०२९) नीलेश देसले मुंबईच्या दिशेने जात होते. वाडीवऱ्हे शिवारातील रायगडनगर परिसरात एका काळ्या रंगाच्या मोटारीतून पाच संशयितांनी आयशरला ओव्हरटेक करत मोटार आडवी लावली. यावेळी या दरोडेखोरांनी ट्रकचालक देसले यांना मारहाण करून विदेशी मद्याच्या बाटल्यांचे सहाशे खोके, आयशर ट्रकसह रोख रक्कम असा एकूण २९ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. तसेच देसले यास मोटारीमध्ये टाकून सिन्नर-घोटी मार्गावरील जंगलात सोडून दिले होते. याप्रकरणी देसले यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात घडला प्रकार कथन करत अज्ञात संशयितांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या दरोड्याच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी लक्ष घालून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले व त्यांच्या पथकाला मार्गदर्शन करीत संशयितांचा माग काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नवले यांनी शहर व ग्रामीण भागातील विविध खबऱ्यांकडे चौकशी करत तपासाला गती दिली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शहरात संशयित दडून बसल्याचा सुगावा पोलिसांच्या हाती लागला पोलिसांनी तत्काळ धाडसत्र सुरू करून पाचही संशयितांना विविध भागांमधून शिताफीने ताब्यात घेतले आहे.