शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लागी नाही छुटे रामा, चाहे जिया जाये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : सिनेमाच्या आरंभापासूनचा पहिला महानायक अभिनेता दिलीपकुमार यांना अभिनयाप्रमाणेच गायनातही रस होता. १९५७ साली प्रदर्शित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : सिनेमाच्या आरंभापासूनचा पहिला महानायक अभिनेता दिलीपकुमार यांना अभिनयाप्रमाणेच गायनातही रस होता. १९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुसाफिर’ या चित्रपटासाठी दिलीपकुमार यांनी स्वत: एक युगलगीत स्वरसम्राझी लता मंगेशकर यांच्या समवेत गायले होते. त्यांच्या ‘लागी नाही छुटे रामा, चाहे जिया जाये’ या एकमेव गीताच्या स्मृतीदेखील दिलीपकुमारप्रेमींनी त्यांच्या या हृदयाच्या कुपीत जपून ठेवल्या आहेत.

मध्यरात्रीच्या निरव शांततेत व्याकूळ करणाऱ्या व्हायोलिनच्या सुरावटी... शेजारच्या खोलीत झोपलेली नायिका त्या सुरावटींनी घायाळ होऊन नायकाच्या खोलीचा पडदा बाजूला सारते... ती त्याला विचारते, ‘क्यूं बजा रहे थे ये धून’...तो म्हणतो, ‘अभी तक याद हैं तुम्हे...’ ती म्हणते, ‘जो धून बीच रास्ते में खो गयी, उसे याद करने से क्या फायदा..’ तो म्हणतो, ‘पर याद तो कभी कभी आ ही जाती हैं!’ अन्‌ त्यानंतर तो म्हणजे अर्थात ट्रॅजिडी किंग दिलीपकुमार त्या गीताच्या आठवणी त्यांच्या सुरांतून व्यक्त करतात अन्‌ नायिकाही साथ देते. अशा अफलातून जमून आलेल्या या गाण्याच्या सुरावटी दिलीपकुमार यांच्या आवाजासह मनात रुंजी घालत राहतात. कोणतेही काम करायचे, तर ते शंभर टक्के जीव ओतून या त्यांच्या स्वभावाची झलक या गीतातूनही अनुभवता येते. समवेत गाण्यासाठी स्वरसम्राझी लतादीदी असल्या तरी आपण तसूभरही कमी पडणार नाही, यासाठी त्यांनी त्यांच्या गायनाचे सर्व कौशल्य पणाला लावल्यानेच ते गाणे अत्यंत जमून आले आहे. शास्त्रीय सुरावटींवर आधारित रचनांसाठी प्रख्यात असलेले संगीतकार सलील चौधरी यांच्या या गीताला शैलेंद्र यांचे शब्द असून, नंतर जगद्‌विख्यात झालेले चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचा हा पहिलाच चित्रपट होता. या गीतात पडद्यावर दिलीपकुमार यांच्यासमोर अभिनेत्री उषा किरण असून, विशेष म्हणजे त्यांचाही नाशिकशी ऋणानुबंध आहे.

इन्फो

दोनच चरणांचे गाणे

दिलीपकुमार यांनी गायलेले हे गाणे म्हणजे पूर्वायुष्यातील आठवणींची झलक असल्याने प्रत्यक्षात ते गाणे केवळ दोनच चरणांचे आहे. मात्र, तरीदेखील त्या गीतासाठी दिलीपकुमार यांनी खास त्यांच्या शैलीत प्रदीर्घ काळ रियाझ करूनच फायनल टेक दिले होते.

फोटो (०७्ंदिलीपकुमार गाणे)

‘मुसाफिर’ चित्रपटाच्या गाण्यासाठी रेकॉर्डिंग करताना अभिनयसम्राट दिलीपकुमार आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर.