शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दानशूर संस्थांच्या माध्यमातून तीन लाख व्यक्तींना अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:17 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली येत असल्याचे समजताच अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या व त्यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत तीन लाख लोकांना अन्नदान केले आहे.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली येत असल्याचे समजताच अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या व त्यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत तीन लाख लोकांना अन्नदान केले आहे. अशा दानशूर स्वयंसेवी संस्थांचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळासाठी इतरही संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.इमर्जंसी अ‍ॅक्शन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यात जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांचे संनियंत्रण केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज बेघर व स्थलांतरित नागरिकांसाठी रिलीफ कॅम्प, भारतीय अन्न महामंडळाकडून धान्य पुरवठा तसेच अनेक स्वयंसेवी संस्थामार्फत अन्नदान केले जात असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. आजपर्यंत ३६ स्वयंसेवी संस्था व व्यक्तींमार्फत नाशिक शहरातील विविध ठिकाणी एकूण तीन लाख लोकांना अन्नदान करण्यात आले आहे. सकल जैन संघटना यांच्यामार्फत म्हसरूळ, जुने नाशिक, सिडको, सातपूर, अंबड व पाथर्डी, द्वारका ते नाशिकरोड, आग्रा हायवे, विल्होळी मंदिर येथील लोकांना अन्नदान केले आहे. सकल जैन संघटना व वेलकम सहकार्य मित्रमंडळ यांच्यामार्फत जुने नाशिक, भद्रकाली, गंगाघाट येथे अन्नदान केले आहे. श्री गुरु व्दारा गुरु नानक दरबार शिंगाडा तलाव, श्री गुरुव्दारा देवळाली व रॉबीन हुड आर्मी यांच्यामार्फत, अमिगो लॉजेस्टीकस इंडिया व दिनीयत संस्था यांच्यामार्फत बेलतगाव, व्हिलरेज, स्टेशनवाडी, जयभवानीरोड, बिटको, उपनगर कॅनॉलरोड, गोरेवाडी, जेलरोड, बागुलनगर झोपडपट्टी येथील लोकांना, वुई फाउंडेशन यांच्यामार्फत सिव्हील हॉस्पिटल नाशिक येथील लोकांना अनिकेत उपासनी यांच्यामार्फत रंगरेज कॉलनी, वडाळा येथे अन्नदान करण्यात आले आहे. श्रीजी प्रसाद व झेप व नयनतारा ग्रुप, गुरमित बग्गा यांच्यामार्फत गाडगेबाबा निवारा, इंद्रकुंड निवारा, मखमलाबाद नाका शाळा, म्हाडा कॉलनी, पाथर्डी फाटा, पंचवटी परिसर येथे अन्नदान करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक