शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅसच्या दरात ९४ रूपयांनी वाढ; व्यावसायिक २२० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 19:25 IST

तेल कंपन्यांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारची पावले गॅसच्या बाबतीतही त्याच मार्गाने पडू लागली असून, घरगुती वापराच्या गॅस सिलींडरवर सरकार ग्राहकांना अनुदान देत असले तरी, वर्षाकाठी अनुदानीत सिलींडर वापराची मर्यादा बारा इतकीच ठेवण्यात आली आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन महिन्यातील ही तिसरी दरवाढदरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून

नाशिक : केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलींडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून, गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता सिलींडरसाठी ग्राहकांना ७३९ रूपये मोजावे लागतील. या बरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलींडरमध्ये तब्बल २२० रूपयांची वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्वच खाद्यपदार्थ विक्रीच्या दरवाढीत होणार आहे.तेल कंपन्यांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारची पावले गॅसच्या बाबतीतही त्याच मार्गाने पडू लागली असून, घरगुती वापराच्या गॅस सिलींडरवर सरकार ग्राहकांना अनुदान देत असले तरी, वर्षाकाठी अनुदानीत सिलींडर वापराची मर्यादा बारा इतकीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या कुटुंबात महिन्याकाठी दोन सिलींडर वापरणारीही कुटूंबे असल्याने त्यांना आता वाढीव दराने म्हणजेच खुल्या बाजारातील दराने सिलींडर खरेदी करावे लागणार आहे. गेल्या तीन महिन्यात सातत्याने ही वाढ झाली असून, घरगुती वापराच्या १४ किलो वजनाच्या सिलींडरची किंमत सप्टेंबर महिन्यात ५९६ रूपये तर आॅक्टोंबर महिन्यात त्यात वाढ होऊन ६४५ रूपये इतकी झाली. नोव्हेंबर महिन्यात हेच दर आता ७३८ रूपये ५० पैसे इतके झाले आहेत. त्यामुळे घरपोच गॅस सिलींडर देणाºया कर्मचाºयाला आता ७५० रूपये देण्यावाचून ग्राहकांना पर्यायच राहिलेला नाही. अशाच प्रकारे व्यावसायिक वापराच्या सिलींडरच्या दरातही दर महिन्याला वाढ होत असून, १९ किलो वजनाच्या या गॅस सिलींडरसाठी सप्टेंबरमध्ये १०८१ रूपये, आॅक्टोंबर महिन्यात ११५८ रूपये व नोव्हेंबर महिन्यात १३०४ रूपये ५० पैसे इतके झाले आहेत. व्यावसायिक सिलींडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, चहा टपरी, खाणावळ चालकांकडूनच अधिक वापर केला जातो. आता थेट एका सिलींडरमागे २२० रूपयांची वाढ झाल्यामुळे साहजिकच खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ करण्याशिवाय व्यावसायिकांना पर्याय राहिलेला नाही.