शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थनगर, सामनगाव परिसरात कुत्र्यांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:27 IST

सिद्धार्थनगर, हनुमाननगर, सामनगाव झोपडपट्टी परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने रहिवासी, महिलांना जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

एकलहरे : सिद्धार्थनगर, हनुमाननगर, सामनगाव झोपडपट्टी परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने रहिवासी, महिलांना जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  एकलहरे गेट नंबर दोन ते चेमरी नंबर एकचा बस स्टॉप या परिसरातील सिद्धार्थनगर, हनुमाननगर, पेट्रोलपंप परिसर येथे सुमारे १५ ते २० मोकाट कुत्रे झुंडीने फिरतात. वाहनधारकांच्या मागे हे कुत्रे लागत असल्याने दुचाकी वाहनधारकांची तारांबळ उडते. कुत्र्यांचा त्रास टाळण्यासाठी वाहनधारक लांबून दुसऱ्या मार्गाने ये-जा करत आहे. पंधरा दिवसांपासून अचानक हे कुत्रे आले कोठून, असा प्रश्न परिसरातील रहिवाशांना पडला आहे. मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे रहिवासी व महिला रस्त्याने एकटे जाणे टाळू लागले आहेत. यामुळे विद्यार्थी व कामगार यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.  झाडाझुडपाच्या ठिकाणी मोकाट कुत्रे ठाण मांडून बसत असल्याने येणाºया-जाणाºयास सहसा दिसून येत नाही. त्यामुळे येणाºया जाणाºयांच्या मागे अचानक मोकाट कुत्रे लागत असल्याने रहिवासी व महिलांची तारांबळ उडत आहे. मनपा हद्दीत पकडलेले मोकाट कुत्रे बाहेर आणून सोडले जात असल्याने त्याचा त्रास एकलहरे परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात हद्दीबाहेर आणून सोडू नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.गेल्या १५ दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची झुंड ही दुचाकी, चारचाकी व पादचाºयांच्या मागे लागत असल्याने तारांबळ उडून वाहन घसरून अपघात होत आहे. कुत्र्याच्या दहशतीमुळे रहिवासी येण्या-जाण्याचा मार्ग बदलुन जात आहे. मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची गरज आहे.  - अशोक परोळसांधे,  किराणा दुकानदार

टॅग्स :dogकुत्रा