शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच प्रवास करतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

नाशिक रोड : देशात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दीड वर्ष होऊनही अद्यापपर्यंत पॅसेंजर रेल्वे व ...

नाशिक रोड : देशात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दीड वर्ष होऊनही अद्यापपर्यंत पॅसेंजर रेल्वे व सर्वसाधारण तिकीट सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय न घेतल्याने पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या गोरगरीब व सर्वसामान्य प्रवासी, मजूर, शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी आदी सर्वांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वे प्रशासन एकीकडे हळूहळू जवळपास सर्वच प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस व मेल एक्स्प्रेस सुरू करीत आहे. मग, फक्त पॅसेंजर गाडीबाबत रेल्वे प्रशासन निर्णय घेत नसल्याने रेल्वे प्रशासनाला सर्वसाधारण तिकीट तर कायमस्वरूपी रद्द करायचे नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पसरू लागल्याने पहिले चार महिने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर प्रारंभी मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. आपापल्या राज्यात गावी परतणाऱ्या मजुरांसाठी रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडून दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजूर, कामगार व प्रवाशांना सोडण्यासाठी विशेष रेल्वे चालविण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोविड स्पेशल, फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे सुरू केल्या.

--इन्फो--

नाशिक रोडमार्गे तीन पॅसेंजर

नाशिक रोड रेल्वेस्थानक मार्गे मनमाड - इगतपुरी शटल, मुंबई - भुसावळ पॅसेंजर, देवळाली - भुसावळ पॅसेंजर या तीन पॅसेंजर धावतात. मुंबई - भुसावळ पॅसेंजर तसेच देवळाली - भुसावळ पॅसेंजर हीदेखील या भागातील प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची ठरते. नाशिक शहर जिल्ह्यातील खानदेश भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी या दोन्ही पॅसेंजर येण्याजाण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

--इन्फो--

पॅसेंजर बंद का?

पॅसेंजर रेल्वेला प्रवाशांची खूप गर्दी होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे रेल्वेचे अधिकारी खासगीत सांगतात; मात्र ज्या मेल व सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत त्यामध्येदेखील सामाजिक अंतर, मास्क वापरणे आदी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रशासनदेखील त्याकडे कानाडोळा करते. रेल्वे प्रशासन मेल एक्स्प्रेस, सुपरफास्ट एक्स्प्रेस, पॅसेंजर यांचे दर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ठरवतात. यांच्यामार्फतच ऑनलाइन तिकीट काढले जाते. कोरोनामुळे आरक्षण तिकिटाला वेगवेगळे नियम केल्याने प्रत्येक रेल्वेचे तिकीट दर वेगळे आहेत. पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची रेल्वे प्रशासन सरळ-सरळ आर्थिक लूट करीत आहे. फक्त पॅसेंजरबाबत रेल्वे प्रशासनाने आडमुठे धोरण स्वीकारले आहे.

--इन्फो--

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

गीतांजली एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, मुंबई - नागपूर विदर्भ एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कामयानी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, पंजाब मेल, पंचवटी, राज्यराणी, तपोवन.

--इन्फो--

जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी किंवा शेजारच्या जिल्ह्यामध्ये कमी खर्चात जाण्यासाठी पॅसेंजर एक्स्प्रेस सर्वच प्रवाशांच्या दृष्टीने गरजेच्या आहेत. पॅसेंजरचे तिकीट दरदेखील कमी असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे होते. परंतु पॅसेंजर रेल्वे बंद केल्याने रस्तामार्गे वाहतूक वाढली आहे.

त्यामुळे अपघाताच्या भीतीसोबत वेळेचा व पैशांचा अपव्यय होतो.

कैलास गायकवाड, प्रवासी

पॅसेंजर रेल्वे ही प्रवासादरम्यान सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय होते. पॅसेंजरमुळे शेतीमाल, भाजीपाला एका गावातून दुसऱ्या गावात किंवा शहरात शेतकऱ्याला आणणे सोपे होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना ताजा शेतीमाल कमी भावात मिळतो व शेतकऱ्यालादेखील रोख रक्कम तत्काळ मिळते. पॅसेंजर ही कामगार, नोकर, शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांच्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

सीमा हाळदे, प्रवासी