शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा संप अखेर मागे

By admin | Updated: March 25, 2017 00:04 IST

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे शुक्रवारी सकाळी डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ शहरातून मोर्चा काढल्यानंतर झालेल्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे शुक्रवारी सकाळी डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ शहरातून मोर्चा काढल्यानंतर झालेल्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक शाखेची सर्वसाधारण बैठक झाल्यानंतर महाराष्ट्र आयएमएच्या निर्देशानुसार आंदोलन रद्द करीत असल्याचे नाशिक शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध भांडारकर यांनी जाहीर केले. त्यामुळे आता शहरातील सर्व ओपीडी आणि इतर वैद्यकीय सेवा नियमितपणे सुरू होणार आहे. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे सर्वसाधारण रुग्णांना झालेल्या गैरसोईबद्दल आयएमए सचिव प्रशांत देवरे यांनी दिलगिरी व्यक्त करतानाच डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचे त्यांनी आभारही मानले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे स्पष्ट केल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.  या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सेल स्थापन करण्यासाठी सहमती दर्शवली. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक खर्च तसेच हल्ल्यात जखमी विद्यार्थी डॉक्टर्सच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्यासह सरकार तयार झाले आहे. (प्रतिनिधी)शासकीय रुग्णालयांची रात्र सेवाआयएमएच्या नाशिक शाखेने सर्व वैद्यकीय सेवा बंद करून आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून शहरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांनी दिवसरात्र सेवा दिली. त्यामुळे संपूर्ण शहरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद असताना आरोग्य सेवांचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नसल्याने हे सरकारी डॉक्टरांच्या कर्तव्यनिष्ठेचे यश मानले जात आहे. आयएमएचा मोर्चा; ‘डॉक्टर वाचवा, पेशंट वाचवा’ची घोषणाबाजी डॉक्टरांवर वेगवेगळ्या कारणांनी होणाऱ्या हल्ल्यांविरोधात जिल्हाभरातील वैद्यकीय संघटनांनी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी व नाशिक शहरासह राज्यभरात डॉक्टरांना मारहाणीच्या घडलेल्या वेगवेगळ्या घटनांच्या निषेधार्थ आयएमएसह सर्व वैद्यकीय संघटनांनी शुक्रवारी (दि. २४) शहरातून मोर्चा काढून घोषणाबाजी केली. आयएमएच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात डॉक्टर वाचवा, पेशंट वाचवा, डॉक्टरांना न्याय हवा, डॉक्टरांना सुरक्षा द्या, अशा मागण्या करीत बुधवारी रात्रीपासून संपावर गेलेल्या डॉक्टरांनी वैद्यकीय पोषाख करून डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ फलक झळकावले. शालिमार चौकातील आयएमए कार्यालयापासून मेनरोडमार्गे रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल व महात्मा गांधी रोड मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.