शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी व्यवसाय करणाºया डॉक्टरांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:58 IST

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयात सेवारत असतानाही खासगीरीत्या दवाखाने चालविणाºया डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्याबाबतचा चौकशी अहवाल तातडीने देण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले.

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयात सेवारत असतानाही खासगीरीत्या दवाखाने चालविणाºया डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्याबाबतचा चौकशी अहवाल तातडीने देण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले.स्थायी समितीच्या बैठकीत मुशीर सय्यद यांनी नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर हे सेवेत असतानाही खासगी दवाखाना चालवित असल्याचा आरोप केला. या आरोपादाखल त्यांनी रुग्णतपासणीचे काही पुरावेही सभागृहाला सादर केले. शासकीय सेवेत असताना डॉक्टरांना खासगी प्रॅक्टीस करता येत नाही, असा नियम असतानाही डॉ. फुलकर हे नियमभंग करत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीतही काहीच सुधारणा नाही. त्यामुळे डॉ. फुलकर यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुशीर सय्यद यांनी केली. सीमा ताजणे यांनीही बिटको रुग्णालयातील भोंगळ कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले आणि वैद्यकीय अधिकाºयाबद्दल तक्रार केली. त्यावर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सदर डॉक्टरची चौकशी करण्याबरोबरच अन्य डॉक्टरही खासगी प्रॅक्टीस करत असल्यास त्याबाबतचा अहवाल पुढच्या सभेत सादर करण्याचेआदेश दिले. फवारणीचे वेळापत्रक देण्याचे आदेशसूर्यकांत लवटे यांनी पेस्ट कंट्रोल ठेकेदाराकडे आवश्यक कर्मचारी नसल्याने डास प्रतिबंधक औषध फवारणी होत नसल्याची तक्रार केली. त्यावर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पेस्ट कंट्रोल फवारणीचे प्रभागनिहाय वेळापत्रक सर्व सदस्यांना देण्याचे आदेश आरोग्याधिकाºयांना दिले. सदस्यांनीही कुठे फवारणी होत नसल्यास त्याबाबतची माहिती आरोग्य विभागाला द्यावी. सदस्यांनी आयुक्तांचे डोळे व हात व्हावेत, अशी अपेक्षाही आयुक्त कृष्ण यांनी व्यक्त केली.