शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
7
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
8
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
9
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
10
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
11
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
12
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
13
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
14
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
15
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
16
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
17
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
18
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
19
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
20
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"

तुमची कामे आम्ही करायची का?

By admin | Updated: January 6, 2017 00:33 IST

नव्या खातेधारकांची परवड; ज्येष्ठांनाही फटकार

शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मिळणारी वागणूक आणि कर्मचाऱ्यांकडून होणारी टोलवाटोलवी याचा अनुभव अनेकदा येतो. या विषयीच्या तक्रारीदेखील नेहमीच केल्या जातात. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी असलेल्या अशा शासकीय कार्यालयांचा कारभार म्हणूनच नेहमी वादग्रस्त ठरत आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बुधवार, दि. ४ रोजी शासकीय कामाच्या वेळेत मुख्य टपाल कार्यालयात प्रत्यक्ष थांबून तेथील कामकाजाचे अवलोकन केले.त्याचा हा आॅन दी स्पॉट वृत्तांत...अहो आजी, चेहरा काही केविलवाणा करू नका बरं का; तुम्हालाच स्लिप भरून द्यावी लागेल, नाही तर उद्या या. अर्ज पूर्ण भरता येत नसेल तर काय मग आम्ही तुमची कामे करायची ? रांगेतून बाजूला व्हा, दुसऱ्याला पुढे येऊ द्या... तुम्ही सकाळी कामावर जाता याला मी काय करू सांगा ! उद्या तुम्हाला सकाळी रांगेतच उभे राहावे लागेल.एटीएम कार्डवाल्या मॅडम असतील येथेच, नाहीतर गेल्या असतील रजेवर...मुख्य टपाल कार्यालयात बुधवारी (दि. ४) प्रस्तुत प्रतिनिधीने संपूर्ण दिवसाच्या कामकाजाचे अवलोकन केले असता ग्राहकसेवा विभागात ग्राहकांची कशी कोंडी होते याचा असा अनुभव आला. काही अंशी ग्राहकांशी सौजन्य दाखविण्यात आलेही, मात्र काम करताना ग्राहकहितापेक्षा स्वत:ची वेळ पाळूनच ग्राहकांना वेळ दिला जात असल्याचे निदर्शनास आले. सर्वात कहर म्हणजे सेव्हिंग खाते उघडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी इतके सुस्तावलेले होते की केवळ अर्ज स्वीकारण्यासाठी तब्बल १० ते १५ मिनिटांचा अवधी लागत होता. मंगळवारी या खिडकीत असलेल्या ‘मॅडम’ आणि बुधवारी असलेले ‘सर’ सारख्याच गतीचे असल्याचा अनुभव ग्राहकांनी कथन केला. पेन्शनधारक आजी-आजोबांचे तर विचारायलाच नको. बॅँकेचे एटीएम कधी मिळेल याची कोणतीही माहिती तेथील कर्मचाऱ्यांना सांगता आली नाही. (प्रतिनिधी)