शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

भविष्याची चिंता नको, वर्तमानात जगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:17 IST

भूतकाळात काय झाले व भविष्यात काय होणार आहे, याची चिंता न करता वर्तमानकाळात आनंददायी जगायला शिका, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी शनिवारी (दि.२) नाशिककरांना दिला. ताणतणाव दूर करण्यासाठी भावनांना मोकळी वाट करून द्या. वर्तमानकाळात जगा, भविष्याची चिंता करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ‘गुरुदक्षिणा’ सभागृहाचे भूमिपूजन करताना डॉ. जगदीश हिरेमठ. समवेत डॉ. राम कुलकर्णी, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. मो. स. गोसावी आदी.नाशिक : भूतकाळात काय झाले व भविष्यात काय होणार आहे, याची चिंता न करता वर्तमानकाळात आनंददायी जगायला शिका, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी शनिवारी (दि.२) नाशिककरांना दिला. ताणतणाव दूर करण्यासाठी भावनांना मोकळी वाट करून द्या. वर्तमानकाळात जगा, भविष्याची चिंता करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक दिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात बोलताना डॉ. जगदीश हिरेमठ यांनी हृदयाच्या आरोग्याचा मंत्र उपस्थिताना दिला. डॉ. हिरेमठ यांनी यावेळी ध्यानधारणेचे फायदे सांगतानाच सहजसोप्या शैलीत ध्वनिचित्रफितीद्वारे हृदयाच्या आरोग्याचे महत्त्व स्पष्ट केले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण निगवेकर, महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसवी, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेतील पी.एचडी. प्राप्त प्राध्यापकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षक व कर्मचारी पुरस्कारांचेही वितरण यावेळी करण्यात आले. यात प्राचार्या डॉ. ज्योती ठाकूर, डॉ. शेखर जोशी, ग्रंथपाल अनुपमा परांजपे, प्रा. पी. एन. चौबे, मुख्याध्यापक एस. डी. डोंगरे यांना यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर डॉ. कविता पाटील यांना उत्कृष्ट शिक्षक उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गिरीश नातू, के. पी. कुलकर्णी यांना आदर्श कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर डॉ. एम. एस. गोसावी फार्मसी कॉलेजला आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बी.वाय.के. महाविद्यालयाच्या ‘व्यवहार’ वार्षिक अंकाला उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार देण्यात आला. तसेच प्रमुख अतिथी डॉ. जगदीश हिरेमठ यांना संस्थेतर्फे फेलोशिप प्रदान करण्यात आली.