शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे उल्लंघन करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:24 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना करण्याबरोबरच नवीन कामांचा शुभारंभ, व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू करून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल,

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना करण्याबरोबरच नवीन कामांचा शुभारंभ, व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू करून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व गट विकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला आहे.जिल्ह्यात शनिवारपासून आचारसंहिता जारी झाली असून, जिल्हा परिषदेने तत्काळ त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांची वाहने जमा करण्याबरोबरच त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीचा राजकीय प्रचारासाठी वापर होऊ नये यासाठी दूरसंचारची सेवा खंडित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आवारातील पदाधिकारी, सदस्यांच्या नावाच्या कोनशिलाही झाकण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारची आचारसंहितेची अंमलबजावणी गावपातळीवर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व खातेप्रमुख व गट विकास अधिकाºयांना पत्रे दिले असून, त्यात आचारसंहितेचे तंतोतंत पालन करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. गावपातळीवर लागलेले राजकीय पक्षांचे फलक, झेंडे, बॅनर, पोस्टर्स ग्रामसेवकांच्या माध्यमातून काढण्यात यावे, त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या मासिक सभांमध्ये कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही याची कल्पना संबंधितांना द्यावी, नवीन कामांचा कार्यारंभ आदेश दिला जाणार नाही.ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांची नाम फलके झाकण्यात यावे, व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा कोणालाही लाभ दिला जाणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच, अधिकारी अथवा कर्मचाºयांकडून कोणताही उमेदवार अथवा राजकीय पक्षाचा प्रचार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचा भंग झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाºयांवर निश्चित केली जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद