शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रु ग्णालयात औषधांची वानवा

By admin | Updated: February 19, 2017 01:22 IST

कळवण : दाखल होणाऱ्या रु ग्णांची गैरसोय

कळवण : सतत तीन ते चारवेळा शासनाचा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार घेणाऱ्या कळवण उपजिल्हा  रु गालयात आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांची वानवा असल्याने उपजिल्हा  रु ग्णालयात आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात दाखल होणाऱ्या आदिवासी व सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. औषध साठा नसल्याचे कारण सांगता येत नसल्याने सर्दी, पडसे, डोकेदुखी असणाऱ्या  रुग्णांनांही सरळ नाशिकचा मार्ग दाखवला जात असल्याचा कटू अनुभव कळवण तालुक्यातील जनतेला आता येऊ लागला आहे.  कळवण उपजिल्हा रु ग्णालयात काही दिवसांपासून साधे सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला या आजारांवरील औषधांचा साठा शिल्लक नसल्याने  रु ग्णांना गोळ्या, औषध बाहेरून घेऊन येण्याचा सल्ला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा देत असल्याचे चित्र आहे.. रु ग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा औषध साठा महिनाभरापासून शिल्लक नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या वृत्ताला एका कर्मचाऱ्याने दुजोरा दिला असून, औषध साठा उपलब्ध करून देण्यासाठी उपजिल्हा रु ग्णालयातील यंत्रणेकडून वरिष्ठ यंत्रणेकडे पाठपुरावा केला जात नसून, केवळ मासिक बिले काढण्याचा सपाटा लावला जात आहे.  उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक सेवेकडे यंत्रणेच्या असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कळवण उपजिल्हा रु ग्णालय आदिवासी जनतेला तत्पर आरोग्य सेवा देण्यास अपयशी ठरले असल्याचा आरोप कळवण तालुक्यातील आदिवासी जनता करू लागली आहे. खासदार आणि आमदार यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वसामान्य शासकीय सेवेपासून वंचित होत आर्थिक झळ सोसत असल्याचे विदारक चित्र तालुक्यात बघावयास मिळत आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून तत्काळ औषधे उपलब्ध करून  द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रोज सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला आदी विकारांमुळे आजारी  रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्याने अनेकजण सलाईनवर असून त्यातच दवाखान्यात खोकल्याच्या औषधांचा तुटवडा असल्याने ग्रामीण भागातील गोरबरीब रु ग्णांना आर्थिक झळ  बसून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. (वार्ताहर)