शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नका

By admin | Updated: June 16, 2014 01:05 IST

मधुकर पिचड : महाराष्ट्रातील आदिवासी संघटना, संस्थांचा निर्धार मेळावा

नाशिक : इतर समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमची कोणतीही हरकत नाही; मात्र आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये़ राज्यघटनेने दिलेल्या सवलती या आदिवासींना मिळाल्याच पाहिजे़ आदिवासींच्या आरक्षणामध्ये बदल करण्याचा वा इतर जातींचा त्यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केल्यास आदिवासी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केले़ अखिल भारतीय विकास परिषद व राज्यातील आदिवासी संघटना व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित आदिवासी निर्धार मेळाव्यात ते बोलत होते़पिचड पुढे म्हणाले, डोंगरदऱ्यात राहणाऱ्या, प्राचीन जीवन जगणाऱ्या, भिन्न संस्कृती असणाऱ्या आदिवासी समाजाचा विकास व्हावा यासाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाला आरक्षण दिले़ आदिवासींच्या ४७ जातींव्यतिरिक्त आणखीन काही जातींचा आदिवासींमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला जातोय़ या विरोधात राज्यातील सर्व आदिवासी समाजाचे खासदार, आमदार, मंत्री यांनी एकत्रितपणे येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांची भेट घेऊन निवेदने दिली आहेत.याउपरही सरकारने आदिवासींच्या आरक्षणात बदलण्याचा प्रयत्न केल्यास राज्यातील ९० लाख आदिवासी निवडणुकांमध्ये निर्णय घेतील, असा गर्भित इशाराही त्यांनी सरकारला दिला़आसाम, मणिपूर, नागालँड या राज्यांतील आदिवासींना केंद्राने स्वायत्त अधिकार दिलेले आहेत़ त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही आदिवासीबहुल जिल्ह्णात स्वायत्त अधिकार दिले जावे अशी मागणी पुढील काळात करण्यात येणार आहे़ राज्यातील ५४ मतदारसंघांत आदिवासींचे प्राबल्य असल्याचे सांगत प्रत्येक आदिवासी बांधवाने आपल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याची तसेच निर्धार करण्याची आवश्यकता असल्याचे पिचड म्हणाले़ कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे उपाध्यक्ष वसंत पुरके म्हणाले की, आदिवासी शांत म्हणून त्यांच्या संयमाची परीक्षा पाहिली जाते़ आदिवासी समाजामध्ये बोगस आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे खऱ्या आदिवासींवर अन्याय होतो़ आदिवासींच्या न्याय व हक्कासाठी नागपूरमध्ये २२ तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे़ राज्यघटनेत बदल करण्याचे अधिकार हे संसदेला असून, आदिवासींच्या आरक्षण बदलाबाबत संसदेत काही प्रस्ताव आल्यास त्यास विरोध करण्याचे काम खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी करण्याची अपेक्षाही पुरके यांनी व्यक्त केली़ या निर्धार मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सांगितले की, आदिवासी समाजात ४७ जाती आहेत़ त्यांचे वर्षानुवर्षांपासून आर्थिक व सामाजिक शोषण होत असून, ते समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत़ राज्यात १९९५ पर्यंत सुमारे एक लाख पाच हजार बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींची नोकरी बळकावली आह़े धनगर, कोळी, कोष्टी, वडारी यांसारख्या जातींचा आदिवासींमध्ये समावेश करण्याचा घाट घातला जात आहे़ या विरोधात आदिवासी समाजातर्फे देशभर आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला़ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेले आदिवासी समाजाचे डॉ़ योगेश भरसट यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी व्यासपीठावर आमदार धनराज महाले, माजी आमदार शिवराम झोले, नरहरी झिरवाळ, वैभव पिचड, हिरामण खोसकर, रंजना भानसी, रवींद्र तळपे, प्रा़ अशोक बागुल उपस्थित होते़ (प्रतिनिधी)