शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत जोडणीशी खेळ नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:12 IST

दिवाळी अर्थात प्रकाशाचा उत्सव त्यामुळे घरे, दुकाने आणि परिसर सर्वत्र झगमगाट आलाच. मात्र हा झगमगाट करताना विद्युत रोषणाईचा आधार प्रत्येकाकडून घेतला जातो, त्याशिवाय झगमगाट अपूर्णच राहतो. त्यामुळे प्रत्येकाने रोषणाईची सजावट करताना खबरदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे, अन्यथा लहान चूकही महागात पडू शकते.

नाशिक : दिवाळी अर्थात प्रकाशाचा उत्सव त्यामुळे घरे, दुकाने आणि परिसर सर्वत्र झगमगाट आलाच. मात्र हा झगमगाट करताना विद्युत रोषणाईचा आधार प्रत्येकाकडून घेतला जातो, त्याशिवाय झगमगाट अपूर्णच राहतो. त्यामुळे प्रत्येकाने रोषणाईची सजावट करताना खबरदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे, अन्यथा लहान चूकही महागात पडू शकते.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरांमध्ये सजावटीची लगबग सुरू झाली आहे. घरामधील एक व्यक्ती नव्हे तर अवघे कुटुंब प्रकाशाचा उत्सव अर्थात दीपोत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या परीने वेगवेगळ्या कामात व्यस्त आहे. घरांची स्वच्छता, फराळाच्या पदार्थांची तयारी, रंगरंगोटी आदी कामे आटोपली आहेत. आता युद्धपातळीवर रोषणाईच्या कामांना वेग आला आहे. सजावटीचे साहित्य खरेदीपासून ते आकर्षक पद्धतीने घरे दुकानांवर लावण्यासाठी नागरिकांकडून तयारी केली जात आहे.  दरम्यान, विद्युत माळा लावताना त्याची विजेच्या मुख्य बोर्डमध्ये जोडणी करताना किंवा एक्स्टेंशन बोर्डमधून जोडणी करताना अनवधानाने लक्ष विचलित झाल्यास किंवा प्लगपीन लावताना धन-ऋणच्या ऐवजी ऋण-धन पद्धतीने वायरी जोडल्या गेल्यास विजेचा धक्का लागू शकतो. त्यामुळे खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. लहानशी चूक किंवा दुर्लक्षामुळे दुर्दैवी अपघाताला निमंत्रण मिळू शकते.  कारण यावेळी व्यक्तीचा थेट संपर्क विजेच्या प्रवाहसोबत येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. विद्युत रोषणाईचे काम करताना लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण नवीन वस्तू बघून उत्सुकतेपोटी त्यांच्याकडून त्या घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असते.... अशी घ्यावी खबरदारीविद्युत माळा जुन्या असल्या तर खबरदारी अधिक घ्यावी. वर्षभरानंतर त्या माळा बाहेर काढलेल्या असल्यामुळे वायरी कुरतडल्या गेलेल्या नाही किंवा त्याचे बल्ब हे ‘शॉर्ट’ झालेले तर नाही ना याबाबत तपासणी करूनच त्यानंतर माळांच्या वायरी मुख्य वीज बोर्डामध्ये टाकाव्या, अन्यथा शॉर्टसर्किटचा धोका ओढवू शकतो. मुख्य बोर्डामधून वीजप्रवाहाशी विद्युत माळेचा संपर्क आल्यास त्यानंतर त्याची दुरुस्ती करण्याचे धाडस करू नये, बोर्डाचे बटन बंद करून वायरी काढाव्या व त्यानंतरच योग्य ती दुरुस्ती करावी. वायर ज्या ठिकाणी कट झालेली असेल तेथे वरील बाजूने उत्तम दर्जाच्या वायर पीवीसी टेपने चिकटवाव्या. यावेळी माळाच्या दोन्ही माळा एकत्र चिटकल्या जाणार नाही, याची काळजी घ्यावी.