शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लहानसहान दोषांची उपेक्षा करू नये

By admin | Updated: July 21, 2016 22:50 IST

चतुर्मास प्रवचन : आचार्य रत्नसेनसुरी महाराज यांचे प्रतिपादन

नाशिकरोड : जहाजाला पडलेले छोटेसे छिद्र हे त्या जहाजाला समुद्रात बुडवू शकते. अशाच प्रकारे जीवनामध्ये लहानसहान दोषांची उपेक्षा करता कामा नये, असे प्रतिपादन आचार्य रत्नसेनसुरी म.सा. यांनी केलेजैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ नाशिक यांच्या वतीने टिळकवाडी महावीर सोसायटी येथील भाविक आराधना भवनमध्ये चतुर्मासनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना आचार्य रत्नसेनसुरी म.सा. म्हणाले की, कपड्याला पडलेले लहानसे छिद्र त्या कपड्याला मूल्यहीन बनविते, भिंतीला पडलेली एक छोटीशी भेग भविष्यात ती भिंत पडण्यास कारणीभूत ठरू शकते. त्याचमुळे आपल्या नजरेमध्ये आपल्याला जो दोष छोटा वाटत असला तरी भविष्यात तोच दोष भयंकर रूप धारण करू शकतो. जी व्यक्ती शुल्लक बाबतीत खोटे बोलते तीच व्यक्ती उद्या मोठ्या गोेष्टीबाबत खोटे बोलू शकते किंवा जी व्यक्ती सामान्य गोष्टीसाठी भांडण करू शकते अन् तीच व्यक्ती उद्या मोठी भांडखोर बनल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे प्रत्येकाने अहंकारापासून स्वत:ला सांभाळले पाहिजे, असे आचार्य रत्नसेनसुरी म.सा. यांनी सांगितले.भस्मकाचा रोगी भले केवढाही आहार घेतला तरी तो शिडशिडीतच राहतो, कारण त्याने घेतलेल्या आहारापासून रक्त बनत नसल्यामुळे तो आहार असाच जळून खाक होत असतो. याचप्रकारे मोक्ष मार्गामध्ये प्रगती साधण्यासाठी केवढीही साधना केली गेली, त्याग, तप, ज्ञान, ध्यान असे कठोरपणे केले पण या सर्व साधनेबरोबर जेव्हा अहंकार जोडला जातो तेव्हा तो या सर्व साधनेला खाऊन टाकतो. अहंकारासह कितीही साधना केली गेली तरी ती आराधना, साधना आत्म्याला मोक्ष मिळवून देण्यास समर्थ ठरत नाही. अहंकार हा आत्महत्त्येचा भस्मक रोग आहे, असेही आचार्य रत्नसेनसुरी म.सा. यांनी सांगितले. (प्रतिनिधी)