शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाहणीचा फार्स ठरू नये !

By किरण अग्रवाल | Updated: December 9, 2018 01:39 IST

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने प्रत्यक्षात शेतीच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, मुख्यमंत्र्यांनाही त्याबद्दल अवगत केले असल्याने राज्य शासनही त्यासंबंधीचा पाठपुरावा करणार आहे. दुष्काळ स्थिती आहे, हे या सर्वांनी अनुभवले व जाणले असल्याने आता ही पाहणी म्हणजे केवळ उपचार न ठरता; बळीराजाचे अश्रू पुसण्यासंदर्भात शासकीय पातळीवरून पावले उचलली जाणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआगामी निवडणुकीत फटका बसल्याखेरीज राहणार नाही.

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने प्रत्यक्षात शेतीच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, मुख्यमंत्र्यांनाही त्याबद्दल अवगत केले असल्याने राज्य शासनही त्यासंबंधीचा पाठपुरावा करणार आहे. दुष्काळ स्थिती आहे, हे या सर्वांनी अनुभवले व जाणले असल्याने आता ही पाहणी म्हणजे केवळ उपचार न ठरता; बळीराजाचे अश्रू पुसण्यासंदर्भात शासकीय पातळीवरून पावले उचलली जाणे गरजेचे आहे.यंदा निसर्गाने डोळे वटारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. पावसाअभावी खरिपाची हानी झाली असून, भाजीपाला, टमाट्यापाठोपाठ कांद्याचे दरही कोसळल्याने शेतकरी संतप्त आहे. त्या भीतीपोटीच दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाला कडेकोट बंदोबस्त पुरवण्याचे आदेश होते. नाशिक जिल्ह्यात दौºयाप्रसंगी शेतकºयांनी आता शेतीसाठी उचललेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न असल्याने विषाचा घोट, आत्महत्या हाच पर्याय असल्याच्या वेदना पथकासमोर मांडल्या आहेत. माणसांनाच प्यायच्या पाण्याची चणचण असल्याने जनावरांचे चारा-पाणी आणायचे कोठून, असाही प्रश्न आहे. जिल्ह्यात आताच टँकर्सने शंभरी गाठली आहे. संपूर्ण जिल्हाच पाण्यासाठी तळमळतो आहे. पिके गेली आहेत; पण राज्य शासनाने मागे जी दुष्काळसदृश तालुक्यांची यादी घोषित केली त्यात काही गावे सुटून गेली होती. तेव्हा ओरड झाल्यावर राज्य शासनाने फेरपाहणी केली; पण उपयोग झाला नव्हता. बरे, दुष्काळी उपाययोजनांची जंत्री मोठी असली तरी प्रत्यक्षात हाती मदत नसून वीजबिल आदींच्या वसुलीचा तगादा सुरूच आहे. त्यामुळे ग्रामस्थ अधिक संतप्त झाले आहेत. तेव्हा, आता कोरडी सहानुभूती अगर कोरडी आश्वासने पुरी! केंद्रीय पथकाच्या पाहणीचाही फार्स न ठरता तातडीने दुष्काळी उपाययोजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे, अन्यथा आगामी निवडणुकीत फटका बसल्याखेरीज राहणार नाही.