शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात कुणाशीही वैर ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:29 IST

आपण दुसऱ्याच्या किती उपयोगी पडतो, कशा पद्धतीने मदत करतो, आपल्या संबंधांवर जीवनाचे भवितव्य अवलंबून असते. क्रोध, ईर्षा येत असते, त्यावर मात करा आणि कुणाबरोबरही वैर ठेवू नका, असे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी केले.

ठळक मुद्देआचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज : व्याख्यानमालेत प्रवचन

नाशिक : आपण दुसऱ्याच्या किती उपयोगी पडतो, कशा पद्धतीने मदत करतो, आपल्या संबंधांवर जीवनाचे भवितव्य अवलंबून असते. क्रोध, ईर्षा येत असते, त्यावर मात करा आणि कुणाबरोबरही वैर ठेवू नका, असे प्रतिपादन जैन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराज यांनी केले. सोमवारी (दि. १३) सकाळी राका कॉलनीत पुण्यप्रकाशच्या प्रांगणात आयोजित ‘संबंधो का टॉप सिक्रेट’ या विषयांवर ते बोलत होते.यावेळी प्रवचनात त्यांनी अनेक उदाहरणे दिली. व्यक्तीवर राग धरला की आपले जीवन निष्फळ बनते, कारण कटुता ही माणसाला खाऊन टाकते आणि जर वेळ निघून गेली तर त्याचा उपयोगही होत नाही. संबंधो का टॉप सिक्रेट यात जीवनाचे ५ महत्त्वाचे अंग येतात त्यावर विजय मिळविता आला पाहिजे. रिलेशन, रिव्हीलेशन, रिप्लेक्शन, रिजेक्शन, रिसेप्शन हे अंग आहेत. संघर्षमय जीवनावर बोलताना जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वर म्हणाले की, आपले संबंध सगळ्यांशी चांगले ठेवा, तरच आपल्याला मृत्युदेखील चांगला येऊ शकतो.यावेळी आचार्य पद्मसुंदर सुरी तसेच राजेंद्र शहा, विलास शहा, प्रवीण जैन, शरद शहा, शेखर सराफ, गौतम सुराणा, सुंदर शहा, महेश शहा, राजन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मंगळवारी (दि. १४) सकाळी ९.३० वाजता राका कॉलनी, शरणपूररोड येथे मूल्योंकी मार्केट व्हॅल्यू या विषयावर प्रवचन होणार आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक