नाशिक : महापालिकेत कामे होतात काय, महापौर त्यासाठी सहकार्य करतात काय, आमदार काय करतात, त्यांचा पालिकेत हस्तक्षेप असतो का, असे अनेक प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांना प्रथमच मोकळे बोलण्याची संधी दिली आणि महापौर तसेच आमदार यांचीही माहिती घेतली.नाशिकमध्ये तीन आमदार आणि पालिकेत सत्ता असलेल्या मनसे नगरसेवकांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात असल्याने अस्वस्थ झालेल्या राज ठाकरे यांनी इनकॅमेरा नगरसेवकांकडून माहिती घेतली. विशेष म्हणजे यापूर्वी थेट महापौरांवर शरसंधान करणार्या राज यांनी आज त्यांच्या कामगिरीची नगरसेवकांकडूनच माहिती घेतली. महापालिकेत कामे होतात किंवा नाही अशी विचारणा करताना ठाकरे यांनी महापौरांची कामगिरी कशी आहे, ते सहकार्य करतात किंवा नाही, असे प्रश्न केले. आमदारांचे सहकार्य कितपत होते, असा प्रश्न करताना त्यांनी आमदारांचा पालिकेत हस्तक्षेप असतो काय असा प्रश्न केला. अनेक नगरसेवकांनी यावर संमिश्र मते व्यक्तकेली. काहींनी महापौरांविषयी काहीसे सकारात्मक सांगितले, तर काहींनी महापौरांविषयी टीकाही केली. लोकांपर्यंत कामे पोहोचविण्यात ते अपयशी ठरले असेही मत विरोध करणार्यांनी व्यक्तकेले. विरोधक मनसेवर आरोप करीत असतात, अशा वेळी त्यांना तोडीस तोड उत्तर महापौर वा अन्य पदाधिकार्यांकडून दिले जात नाही. काही पदाधिकारी पालिकेत अपवादानेच किंवा थेट महासभेच्या दिवशीच येतात, असेही नगरसेवकांनी सांगितल्याचे वृत्त आहे. माध्यमे, जनसंपर्क यासाठी जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणीही काहींनी पुढे केली. माध्यमांपर्यंत चांगल्या कामांपेक्षा वाईट कामांचीच चर्चा होत आहे, ती या निमित्ताने टाळता येईल, असेही काही नगरसेवकांनी सुचविल्याचे समजते...इन्फो..निवडणुकीत समन्वयाचा अभावलोकसभा निवडणुकीत उमेदवार डॉ. प्रदीप पवार उच्चशिक्षित असल्याने योग्य होते, परंतु त्यांचा प्रचाराचे कोणतेही नियोजन नव्हते. उमेदवार आणि कार्यकर्ता यांच्यात दुवा साधण्याचा प्रयत्न झाला नाही. पक्षाच्या पदाधिकार्यांनी यात लक्ष घालणे गरजेचे होते, असेही काही नगरसेवकांनी स्पष्टपणे सांगितले....इन्फो...नगरसेवकांच्या कामांची यादी मागविली...लोकसभा निवडणुकीत नागरिकांकडून पालिकेतील कामगिरीविषयी लोकांनी विचारले काय या प्रश्नावर एका नगरसेवकाने तर उत्तरे देऊन देऊन घसा बसला असे सांगितले. प्रभागात चांगली कामे झाल्याचे सांगणार्या वंदना शेवाळे (१८ कोटींची कामे) शोभना श्िंादे, संगीता गायकवाड, दीपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे यांच्याकडून कामांची यादी मागितली.
महापौर सहकार्य करतात का? राज ठाकरेंचा प्रश्न: आमदारांच्या कतृर्त्वाविषयी केली विचारणा
By admin | Updated: May 10, 2014 23:55 IST