नाशिक : वेदांच्या पठणाने मानवाचे जीवन पवित्र होते. ज्ञानेश्वरीचे पठणही योग्य वयात व्हावे. मनात कोणताच विचार न येणे म्हणजे ब्रह्मस्वरूपता होय. अशी अवस्था मानवी जीवनात यायला हवी, असे प्रतिपादन चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. मातोश्री रामप्यारीबाई सारडा धार्मिक प्रतिष्ठान व किरणदेवी सारडा सत्कार्य निधी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर राज्यस्तरीय ज्ञानेश्वरी लेखी परीक्षेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. ज्ञानेश्वरी पठणाची गोडी वाढावी, विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीकडे आकृष्ट व्हावे, या उद्देशाने १९९६ पासून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. राज्यात नाशिक, औरंगाबाद, चांदूरबाजार, अमरावती, लातूर, पांढरकवाडा, बडनेरा, जळगाव, पुणे, आळंदी आदि अकरा केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात आली. अकरा हजार विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. परीक्षेत मामासाहेब दांडेकर लिखित ‘ज्ञानेश्वरी’तील पाच ओव्यांचा अर्थ लिहावयाचा होता. यावेळी किसनलाल सारडा उपस्थित होते. श्रीरंग सारडा यांनी देगलूरकर महाराजांचा सत्कार केला. .
ज्ञानेश्वरीचे पठण योग्य वयात व्हावे
By admin | Updated: June 10, 2016 00:10 IST