शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:31 IST

तीन दिवसांपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तुंगारेश्वर, ता. वसई, जि. पालघर येथील बालयोगी सदानंद महाराज श्री ज्ञानेश्वरी पारायण समितीतर्फे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ज्ञानेश्वरी पारायणासाठी हजारो भाविक पारायणासाठी बसले आहेत. यावेळी ब्रह्मवृंदांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देहजारो भाविकांची उपस्थिती : बालयोगी सदानंद महाराज यांच्यातर्फे धार्मिक कार्यक्रम

त्र्यंबकेश्वर : गेल्या तीन दिवसांपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तुंगारेश्वर, ता. वसई, जि. पालघर येथील बालयोगी सदानंद महाराज श्री ज्ञानेश्वरी पारायण समितीतर्फे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ज्ञानेश्वरी पारायणासाठी हजारो भाविक पारायणासाठी बसले आहेत. यावेळी ब्रह्मवृंदांचा सत्कार करण्यात आला.पारायणाचे नेतृत्व स्वत: बालयोगी सदानंद महाराज करीत असून, व्यासपीठावर कबीर महाराज म्हात्रे, पुरु षोत्तम महाराज म्हात्रे, महादेव बुवा शहाबाजकर, देसाई महाराज उपस्थित होते. पारायणानंतर विश्वनाथ महाराज वारिंगे हे ज्ञानेश्वरी पारायणवर चिंतन सांगत आहेत. सोहळ्यामध्ये आलेल्या भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना नि:शुल्क आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्यात येत आहे.सुप्रसिद्ध गायक नारायणदास बुवा पाटील, वैभव कडू यांची भजने झाली. त्यानंतर त्र्यंबकेश्वर, नाशिकमधील वेदशास्र संपन्न ब्रह्मवृंदांचा सत्कार करण्यात आला. सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने परमपूज्य बालयोगी श्री सदानंद महाराजांचा सन्मान करून त्यांना एक सन्मान पत्रही देण्यात आले. महाराष्ट्रातील थोर अभ्यासू कीर्तनकार महादेव महाराज राऊत यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सदर कार्यक्रमाच्या रूपरेषेची माहिती व कार्यक्रम मार्गदर्शक विश्वनाथ महाराज वारिंगे व व्यवस्थापक संजय भंडारे यांनी दिली. सातही दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, बालयोगी श्री सदानंद महाराज यांनी आपले जीवनकार्य ज्ञानेश्वरी प्रचार प्रसाराकरिता वाहून घेतले असून, ज्ञानेश्वरीचा प्रसार पारायणाद्वारे महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, ओरिसा, तामिळनाडू याबरोबरच पाश्चात्त्य देशांमध्ये कॅनडा, थायलंड, मॉरिशस, श्रीलंका आदी देशांमध्ये केला आहे. या देशांचे, महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांत पारायणापेक्षा वाचनाला महत्त्व दिले जाते. ज्ञानेश्वरीचा वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. श्रीगुरु जोग महाराज पुण्यतिथी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यस्तरीय भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिनाम महोत्सवाचे आयोजन श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आले आहे.ब्रह्मवृंदांचा सत्कारनाशिक-त्र्यंबकेश्वर येथील शांतारामशास्त्री भानोसे, धनंजयशास्त्री जोशी, दिनेशशास्त्री गायधनी, मधुकर अकोलकर, केदारशास्त्री पाटणकर, तीर्थराजशास्त्री घैसास, बाळासाहेब दीक्षित, रमेश सुलाखे, गणेश पुरी, योगेश शुक्ल, रमेश पाटणकर, अनंत ढेरगे, चेतन ढेरगे, त्रिविक्र म जोशी, सुनील सुलाखे, जगदीश जोशी, बाळासाहेब सुलाखे आदी सर्व वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मवृंदांचा सत्कार शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ हार व ज्ञानेश्वरीची प्रत देऊन करण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक