शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक दु:खातून मुक्ती देणारा ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:27 IST

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अठरापगड जातीच्या लोकांपुढे वाचली आहे. ज्ञानेश्वरीकडे बघताना एक दृष्टी हवी. गीता, ज्ञानेश्वरी हे महान ग्रंथ समजून घेण्यासाठी अर्जुन होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरीच्या सहवासात आल्यानंतर मनुष्य दु:खी जीवन जगणे विसरून जातो, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व लेखक वामन देशपांडे यांनी केले.

ठळक मुद्देवामन देशपांडे : लेखक तुमच्या भेटीला

नाशिक : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अठरापगड जातीच्या लोकांपुढे वाचली आहे. ज्ञानेश्वरीकडे बघताना एक दृष्टी हवी. गीता, ज्ञानेश्वरी हे महान ग्रंथ समजून घेण्यासाठी अर्जुन होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरीच्या सहवासात आल्यानंतर मनुष्य दु:खी जीवन जगणे विसरून जातो, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व लेखक वामन देशपांडे यांनी केले.ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक तुमच्या भेटीला या व्याख्यानमालेचे पुष्प रविवारी (दि.९) देशपांडे यांनी ‘ज्ञानेश्वरीतील सुवर्णकण’ या विषयावर गुंफले. शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात झालेल्या या व्याख्यानाचे प्रारंभी प्रा. डॉ. उन्मेश कुलकर्णी संकलित श्री संत गजानन महाराजांची शिकवण या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठावर राजेंद्र विद्वांस, प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होते. २००१साली देशपांडे यांनी ज्ञानोबा माउलींच्या निवडक अशा शंभर अभंगांवर भाष्य करीत ‘ज्ञानेश्वरीतील सुवर्णकण’ हे चरित्र लिहिले आहे. त्यांनी या चरित्रलेखनाचा अनुभव सांगताना ज्ञानेश्वरीतील विविध अध्याय आणि अभंगांमधील ओवींचे विश्लेषण केले. यावेळी ते म्हणाले, ज्ञानेश्वरी तास, दोन तासांत सांगण्याचा मुळीच विषय नाही. मला ज्ञानेश्वरीच्या या निवडक अभंगांवर भाष्य करण्यास सुमारे साडेपाच महिन्यांचा कालावधी लागला.या रूपाने मला ज्ञानदेवांना अक्षररूपी प्रदक्षिणा घालण्याची संधी भगवंताने दिली ज्ञानेश्वरी माझा श्वास असून, ज्ञानेश्वरी वाचताना माउलींचा उपदेश व त्याची महती सहज लक्षात येते, असे देशपांडे यावेळी म्हणाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक