घोटी : इगतपुरी तालुक्यात महत्वपूर्ण असणाऱ्या देवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर तोकडे यांची निवड झाली.सरपंच ज्ञानेश्वर शिवराम उघडे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक झाली. यावेळी उपसरपंच म्हणून ज्ञानेश्वर काळू तोकडे यांची निवड करण्यात आली.पॅनलचे नेते ज्ञानेश्वर तोकडे, प्रकाश तोकडे, जंगलु तोकडे यांच्या नेतृत्वाखाली देवळे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. सरपंच ज्ञानेश्वर उघडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत उपसरपंचपदासाठी ज्ञानेश्वर काळू तोकडे यांची निवड करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य रंजना तोकडे, यशवंत उघडे, लहानू उघडे, ललिता उघडे, ग्रामसेवक प्रकाश कौटे आदी उपस्थित होते. ग्रामस्थ झुंगाजी लायरे, प्रकाश दालभगत, संतोष तोकडे, योगेश तोकडे, आकाश तोकडे, हेमंत तोकडे, तानाजी तोकडे, शिवराम उघडे, भागा उघडे, सीताराम उघडे यांनी या नविन निवडीचे कौतूक केले.
देवळे उपसरपंचपदी ज्ञानेश्वर तोकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 19:12 IST
घोटी : इगतपुरी तालुक्यात महत्वपूर्ण असणाऱ्या देवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर तोकडे यांची निवड झाली. सरपंच ज्ञानेश्वर शिवराम उघडे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक झाली. यावेळी उपसरपंच म्हणून ज्ञानेश्वर काळू तोकडे यांची निवड करण्यात आली.
देवळे उपसरपंचपदी ज्ञानेश्वर तोकडे
ठळक मुद्देघोटी : नवनिर्वाचित सदस्यांच्या विशेष बैठकीत निर्णय