शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सिडको भागात डीजेमुक्त मिरवणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:53 IST

सिडको : ‘गणपती बाप्पा मोरया- पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत सिडको व अंबड भागातील सार्वजनिक मंडळांनी तसेच घरघुती गणरायास ढोल-ताशांच्या गजरात गुलालांची उधळण करीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदाच्या वर्षी सिडको व अंबड भागातील गणेश मिरवणुका शंभर टक्के डॉल्बीमुक्त (डी.जे.) झाल्या असून, रात्री साडेबारा वाजेपर्यंत मूर्ती संकलन व गणेश विसर्जन करण्यात आले. सिडको भागात १९ हजार १३६ मूर्तींचे संकलन झाले असून, सुमारे १७ टन निर्माल्य जमा झाल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.

सिडको : ‘गणपती बाप्पा मोरया- पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत सिडको व अंबड भागातील सार्वजनिक मंडळांनी तसेच घरघुती गणरायास ढोल-ताशांच्या गजरात गुलालांची उधळण करीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदाच्या वर्षी सिडको व अंबड भागातील गणेश मिरवणुका शंभर टक्के डॉल्बीमुक्त (डी.जे.) झाल्या असून, रात्री साडेबारा वाजेपर्यंत मूर्ती संकलन व गणेश विसर्जन करण्यात आले. सिडको भागात १९ हजार १३६ मूर्तींचे संकलन झाले असून, सुमारे १७ टन निर्माल्य जमा झाल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.सिडको तसेच अंबड भागात सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करण्यात आले.यंदाच्या वर्षी डॉल्बी (डी.जे.) वाजविण्यास बंदी असल्याने मंडळांकडून ढोल-ताशांचा वापर करीत मिरवणूक काढण्यात आली. शिवगंगा सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ व ओम गुरुदेव मित्रमंडळ या दोन मुख्य मिरवणुका होत्या. याबरोबरच घराघरांतील गणेशमूर्ती दान करण्यात आल्या. सिडको व अंबड भागातील सिडको वसाहत मित्रमंडळ, राजे छत्रपती मित्रमंडळ, श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ, शिवराज युवक मित्रमंडळ, राजे संभाजी सांस्कृतिक कला व क्रीडा मित्रमंडळ, शिवसाई सामाजिक विकास संस्था, मावळा सामाजिक प्रतिष्ठान वक्रतुंड मित्रमंडळ, सद््भावना युवक मित्रमंडळ, तुळजाभवानी मित्रमंडळ, वंदे मातरम् मित्रमंडळ, खोडे मळा येथील भैरवनाथ मित्रमंडळ, संस्कृती बालगणेश मित्रमंडळ, वृंदावन कॉलनी मित्रमंडळ यांसह अनेक सार्वजनिक मंडळांनी गणरायास भावपूर्ण वातारणात निरोप दिला. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महापालिकेच्या सिडको विभागातील संभाजी स्टेडिअम (१० हजार ८७८), पवननगर स्टेडिअम ( ४ हजार ३४०), पिंपळगावखांब वालदेवी घाट ( २ हजार ७३), डे केअर शाळा मैदान (१ हजार १५८), जिजाऊ सभागृह, गोविंदनगर (६८७) अशा एकूण १९ हजार १३६ मूर्ती संकलित करण्यात आल्या असून, सुमारे १७ टन निर्माल्य गोळा करण्यात आले.