कळवण : कळवण नगरपंचायत निवडणुकीत ७५.८२ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदान करण्याचा उत्साह दिसून आला. प्रभाग पाचमधील मतदान मशीनमध्ये बिघाड झाला होता; मात्र तत्काळ दुसरे मशीन बसवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान सुरळीत पार पडले. झालेल्या मतदान आकडेवारीवरून निवडणुकीचे निकाल धक्कादायक लागण्याची चिन्हे आहेत. १६ प्रभागांत ७४ उमेदवारांनी नशीब अजमाविले आहे. पहिला किंवा पहिली नगरसेवक व नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळविणेसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. यामुळे मतदारांना येणाऱ्या दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मी दर्शन झाले आहे. एका मताचा भाव पाच ते दहा हजारापर्यंत गेल्याची चर्चा आज सकाळपासूनचा चौका चौकात रंगली होती. तर बाहेर गावी वास्तव्यास गेलेल्या मतदारांना कळवणला आणण्यासाठी वाहन जेवण . व मतदानाची मोठी किमत मोजल्याचे सजते. आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रंगा लागल्या होत्या.दरम्यान एक ते दीड वाजेच्या दरम्यान प्रभाग क्र मांक पाचचे मतदान इव्हीएम मशीन काहीकाळ बंद पडल्याने मतदारांना केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागले. काही वेळाने दुसरे मशीन बसवून मतदान प्रक्रि या पुर्ववत सुरु करण्यात आली. हा प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय इमारतीत सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे. (वार्ताहर)
दिवाळीपूर्वी मतदारांना लक्ष्मीदर्शन
By admin | Updated: November 1, 2015 22:35 IST