शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रविवारमुळे दिवाळी खरेदीची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:40 IST

अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असून, रविवार सुटीच्या दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुल्ल झाल्या आहेत. रविवार असल्याने सुटीची संधी साधत नाशिककरांनी खरेदीचा आनंद लुटला.

नाशिक : अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असून, रविवार सुटीच्या दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुल्ल झाल्या आहेत. रविवार असल्याने सुटीची संधी साधत नाशिककरांनी खरेदीचा आनंद लुटला. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोडवर प्रचंड गर्दी झाल्याने या मार्गावर चारचाकी वाहनांना मनाई करण्यात आली होती.  जुने आयुक्तालयासमोरील तिबेटियन मार्केटमध्ये तयार कपड्याच्या बाजारात तरुणांची मोठी गर्दी झालेली दिसते. या ठिकाणी महाविद्यालयीन तरुणांसाठी लागणारे फॅशनेबल तयार कपडे उपलब्ध असल्याने या ठिकाणी खरेदीला वेग आला आहे. शिवाय तिबेटियन मार्केटमध्ये हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करणारे फॅशनेबल कपडे खरेदीकडेही कल असल्याचे दिसून आले. शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड शालिमार, महात्मा गांधीरोड, रविवार कारंजा, पंचवटी या ठिकाणीदेखील ग्राहकांची गर्दी वाढण्यास प्रारंभ झाला आहे. नाशिकरोडच्या आजूबाजूला खेडेगावाचा परिसर असल्याने गाव खेड्यातील ग्राहकांनी नाशिकरोडची बाजारपेठ बहरली आहे. नाशिकरोडच्या बाजारपेठत मागील आठवड्यापासूनच गर्दी झाल्याचे चित्र आहे. रविवारी तर मोठ्या प्रमारात गर्दी झाली होती. देवळाली कॅम्प येथील लेव्हट मार्केटमध्येदेखील ग्राहकांची गर्दी झाली आहे.  दिवाळी खरेदीसाठी देवळालीकॅम्प, भगूर, लहवित या गावांबरोबरच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात ग्राहक कॅम्पमध्येच खरेदी करतात. त्यामुळे येथेही गर्दी झाल्याने बाजारपेठ बहरली आहे.दिवाळी तोंडावर आल्याने खरेदीची लगबग वाढल्याचे चित्र असून, बाजारपेठेत रेलचेल वाढल्याचे दिसून येते. मेनरोड येथे सर्वप्रकारच्या वस्तूंचे मार्केट असल्यामुळे सर्वाधिक गर्दी याच ठिकाणी होते. शनिवार व रविवारची सुटी असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार