शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

गरिबांची दिवाळी यंदा साखरेविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:07 IST

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत लाभार्थ्यांना सणासुदीला स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देणाºया सरकारने यंदा कठोर होत, फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड फक्त एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन अन्य लाखो लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या कार्डधारकांना नियमित एक किलोच साखर मिळेल, त्यात सणासुदीच्या अतिरिक्त साखरेचा मात्र समावेश नाही.

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत लाभार्थ्यांना सणासुदीला स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देणाºया सरकारने यंदा कठोर होत, फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड फक्त एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन अन्य लाखो लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या कार्डधारकांना नियमित एक किलोच साखर मिळेल, त्यात सणासुदीच्या अतिरिक्त साखरेचा मात्र समावेश नाही.गोरगरिब व विशेषत: वार्षिक एक लाखापेक्षा कमी उत्पन्न गटातील नागरिकांना खुल्या बाजारातील महाग अन्नधान्य तसेच साखर घेणे परवडत नसल्याने शासनाची सार्वजनिक वितरण प्रणाली गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात राबविली जात आहे.केंद्र व राज्य सरकार मिळून अशा घटकांसाठी स्वस्त दरात रेशनवर अन्नधान्य उपलब्ध करून देत असल्याने आजही रेशनचे धान्य विकत घेऊन खाणाºयांची संख्या लाखोंंच्या घरात आहे. नाशिक जिल्ह्यात साडेसात लाख रेशन कार्डधारक असून, त्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबांना दरमहा रेशनवर स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जात आहे.परंतु मे महिन्यापासून खुल्या बाजारात साखरेचे दर चाळीस रुपयांवर पोहोचल्यापासून राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून दिली जाणारी साखर बंद करून टाकली आहे. फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड साखर देण्याचा निर्णय घेतला आहे.पूर्वी रेशन कार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दरमहा पाचशे ग्रॅम साखर महिन्याकाठी दिली जात होती. आता एका कार्डधारकास एक किलोच साखर देण्यास सुरुवात झाली असून, पूर्वी सणासुदीला व विशेषत: दसरा, दिवाळी सणानिमित्त गोरगरिबांना गोडधोड करून खाता यावे म्हणून प्रतिमानसी दीडशे ग्रॅम साखर अतिरिक्त उपलब्ध करून दिली जात होती. यंदा मात्र त्यालाही राज्य सरकारने कात्री लावली आहे. त्यामुळे दिवाळी गोड करायची असेल तर त्यासाठी खुल्या बाजारातील ४० रुपये दराने साखर खरेदी करावी लागणार आहे.फक्त अंत्योदय पात्रशासनाने फक्त अंत्योदय योजनेत पात्र ठरलेल्या कुटुंबीयांनाच साखर देण्याचा निर्णय घेतला असून, नाशिक जिल्ह्यातील एकूण साडेसात लाख शिधापत्रिकाधारकांपैकी पावणे दोन लाख कुटुंबे अंत्योदय योजनेत समाविष्ट आहेत. सरासरी चार ते दहा हजार लाभार्थी प्रत्येक तालुक्यात आहेत. त्यामुळे शिधापत्रिका असूनही लाखो कुटुंबे साखरेपासून वंचित राहणार आहेत.