शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘त्यांच्या’ वस्तीतली दिवाळी माणूसपण जागवणारी...

By admin | Updated: October 20, 2014 00:07 IST

‘त्यांच्या’ वस्तीतली दिवाळी माणूसपण जागवणारी...

 

सुदीप गुजराथी

नाशिक‘त्यांच्या’ वस्तीतल्या अरुंद गल्ल्यांमधले वातावरण जरासे उजळून निघते... कोंदट, अंधाऱ्या खोल्यांमध्ये पणत्यांचा प्रकाश पसरतो... त्यातल्याच एखाद्या खोलीत चक्क लक्ष्मीची पूजा मांडली जाते... मग ‘मालकीण’ हिंदू असो की मुस्लीम, दुनियेने निर्माण केलेल्या धर्माच्या, भेदभावाच्या भिंती इथे गळून पडतात अन् ‘त्यांची’ दिवाळी माणूसपणाने झळाळून निघते...हे वर्णन आहे शहरातील वेश्यावस्त्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचे... समाजातली अन्य माणसे जेव्हा दिवाळीचा सण साजरा करण्यात रममाण झालेली असतात, तेव्हा परिस्थितीमुळे या व्यवसायात आलेल्या वेश्यांच्या वस्तीतही माणुसकीचे दिवे पेटलेले असतात... काही दिवसांसाठी का होईना, या महिलांच्या अंधारलेल्या आयुष्यात थोडासा उजेड आलेला असतो... नाशिक शहरात सात ते आठ ठिकाणी वेश्यांची वस्ती आहे. तेथे सुमारे सातशे ते आठशे महिला देहविक्रयाचा व्यवसाय करतात. (सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, शहरात सुमारे दोन ते अडीच हजार महिला या व्यवसायात आहेत; मात्र त्यांचा व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू असतो.) प्रत्येक वस्तीत अनेक खोल्या असलेल्या एकेका घरात सुमारे पन्नास-साठ महिला व्यवसाय करतात. एका महिलेच्या वाट्याला ‘नंबर’प्रमाणे दिवसातून दोन किंवा तीन ‘गिऱ्हाइके’ येतात. त्यातून तिला साधारणत: तीनशे रुपयांची कमाई होते. त्यातला काही भाग घरमालकिणीला द्यावा लागतो. वस्तीतल्या काही महिला तेथेच वास्तव्यास असतात, तर काही आपल्या घरून व्यवसायासाठी तेथे येतात. सकाळी ७ वाजेपासून ते रात्री १ पर्यंत व्यवसाय चालतो. दिवाळीच्या दिवसांत या वस्त्यांचे रूप थोडेफार बदलते. कुटुंबीय स्वीकारत असल्यास काही महिला सणाला घरी जातात. इतरांची दिवाळी मात्र वस्तीतच साजरी होते. तेथे साजऱ्या होणाऱ्या दिवाळीबद्दल या महिला भरभरून बोलतात, ‘दुनियेच्या दिवाळीची आम्हाला पर्वा नाही. आम्ही आमच्या परीने हा सण साजरा करतो. नवे कपडे घेतो, फराळाचे पदार्थ तयार करतो. इथे सगळ्या जाती-धर्मांच्या महिला राहत असल्या, तरी साऱ्या जणी सारख्याच उत्साहात दिवाळी साजरी करतात. इथल्याच एखाद्या घरात लक्ष्मीपूजन केले जाते. फटाकेही फोडतो. वस्ती हे आमचे कुटुंबच असते. त्यामुळे हक्काचे घर असले, तरी तिथल्यापेक्षा येथेच जास्त आनंद मिळतो...’समाजाकडून वेश्यांना अनेक दूषणे दिली जात असली, तरी या महिला मात्र समाजाविषयी चकार शब्दाचीही तक्रार करीत नाहीत... ‘आम्हीच असे काम करतो, लोकांना नावे कशाला ठेवू? लोक आमच्याशी चार शब्द गोड बोलतात, हेच खूप झाले... लोकांकडून आम्हाला दुसरे काहीही नको’, असे या महिला प्रामाणिकपणे सांगतात, तेव्हा त्यांचे हे शब्द त्यांच्यातल्या सच्चेपणाबरोबरच आयुष्याकडून त्यांना किती कमी अपेक्षा आहेत, याचीही जाणीव करून देतात...