शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लेकीच्या शिक्षणासाठी दिव्यांग पित्याची तगमग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:12 IST

येवला : तालुक्यातील हडप सावरगाव येथील विद्यार्थीनीला शिक्षणासाठी रोज सहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे लक्षात येताच तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सदर विद्यार्थीनीस सायकल भेट देवून शिक्षणातील अडसर दूर केला आहे.

ठळक मुद्देहडप सावरगाव : शिक्षकांनी सायकल भेट देत थांबवली पायपीट

येवला : तालुक्यातील हडप सावरगाव येथील विद्यार्थीनीला शिक्षणासाठी रोज सहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे लक्षात येताच तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सदर विद्यार्थीनीस सायकल भेट देवून शिक्षणातील अडसर दूर केला आहे.रेंडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक सचिन वावळ एका सायकल दुकानात उभे होते. यावेळी एक दिव्यांग व्यक्ती आपल्या मुलीसाठी जुनी सायकल खरेदी करण्यासाठी आल्याचे त्यांनी पाहिले. त्यांची परिस्थिती बेताची असल्याचे त्यांना जाणवले तर भर उन्हात वीस किलोमीटरवरून स्वतःची सायकल चालवत आलेली ही दिव्यांग व्यक्ती पाहून वावळ यांनी त्यांची अधिक विचारपूस केली. शिक्षणासाठी रोज सहा किलोमीटर पायी जाणार्‍या लेकीसाठी जुनी सायकल खरेदी करणार्‍या बापाची तळमळ पाहुन वावळ यांनी मदतीचे आश्वासन दिले. शिक्षकांच्या एका व्हाटस्अप ग्रुपवर त्यांनी मदतीचं आवाहन केल्यानंतर अवघ्या तासात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि जमलेल्या पैश्यातून हडप सावरगावच्या दत्तू कोल्हे यांच्या मुलीला शिक्षणासाठी नवीन सायकल खरेदी करुन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देशमुख, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांच्या हस्ते कोटमगाव देवी येथील प्रांगणात भेट देण्यात आली. याप्रसंगी सचिन वावळ, एकनाथ घुले, किरण पेंडभाजे, चंद्रकांत जानकर किरण जाधव, दिनेश मानकर, संतोष मुंडे, ज्ञानेश्वर पायमोडे, राजू गांगुर्डे, विकास राठोड, अजित मुळे, अंबादास शेकडे, संतोष सोनवणे, जयसिंग पिंपळे, गोपाळ तिदार, महादेव खरात, आजिनाथ आंधळे, सुभाष काटे, सुरेश तागड, विलास बांगर, कमलेश शिरोरे आदिसह शिक्षक उपस्थित होते.वाघमारे यांच्याकडून गौरवोद‌्गारपुरूषी मानसिकतेने ग्रासलेल्या समाजात आजही मुलींच्या शिक्षणाकडे पाहीजे तितके लक्ष पालक देताना दिसत नाहीत. पण दत्तु कोल्हे यांचा विचार व तळमळ सर्व समाजाला आदर्शवत अशी आहे. स्वतःची परिस्थिती लेकीच्या शिक्षणात अडसर ठरू नये म्हणून धडपडणारा हा बाप मुलगी आहे म्हणून मध्येच शिक्षण सोडायला लावणार्‍या अनेक सुदृढ धनदांडग्या पालकां पेक्षा विचाराने नक्कीच श्रीमंत आहे, असे गौरवोद्गार यावेळी गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी यावेळी काढले.