शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अर्थचक्राला आता मिळणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:21 IST

कोरोनाच्या प्रभावातील जिल्ह्यामधील १७ प्रतिबंधित क्षेत्रं वगळता जिल्ह्यातील काही भागात अटी-शर्तींच्या अधीन राहून काही उद्योग आणि व्यवसायांना परवानगी देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अर्थचक्र पुन्हा एकदा गतिमान होणार आहे, तर शासकीय कार्यालयांमध्ये दहा टक्के कर्मचारी उपस्थितीलाही परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देअधिसूचना : अटी-शर्तींच्या अधीन उद्योग; व्यवसायांना परवानगी

नाशिक : कोरोनाच्या प्रभावातील जिल्ह्यामधील १७ प्रतिबंधित क्षेत्रं वगळता जिल्ह्यातील काही भागात अटी-शर्तींच्या अधीन राहून काही उद्योग आणि व्यवसायांना परवानगी देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अर्थचक्र पुन्हा एकदा गतिमान होणार आहे, तर शासकीय कार्यालयांमध्ये दहा टक्के कर्मचारी उपस्थितीलाही परवानगी देण्यात आली आहे.लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या काही उद्योग, व्यवसायांना परवानगी देण्यात आली असली तरी त्यांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाने काढलेल्या नव्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात मालेगाव, नाशिक, सिन्नर, बागलाण, चांदवड या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने जे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेले आहे अशा ठिकाणांहून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरातील बांधकामे सुरू करण्यासाठी परवानगी दिली असली तरी त्यांना अन्य जिल्ह्यातून तसेच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या ठिकाणाहून मजूर, कारागीर यांची ने-आण करता येणार नाही. औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनाही हाच नियम लागू असणार आहे.उद्योग सुरू करण्यासाठी कंपनी मालकांना एमआयडीसीच्या संकेतस्थळावर तशी आॅनलाइन नोंद करावी लागणार आहे. तसेच कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामगार, कर्मचारी यांना सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळणे, नियमित मास्क घालणे हे अनिवार्य असणार आहे.दरम्यान, जिल्ह्यातील सर्व धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.‘हे’ व्यवसाय राहतील सुरूजीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मत्स्य व्यवसाय, इंडस्ट्री (प्रतिबंध क्षेत्र वगळून), जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणारे ट्रक, ट्रक्सचे गॅरेज, शेतीसंबंधीची सर्व कामे, खतांची दुकाने, सिंचन प्रकल्प मनरेगाची कामे, डिजिटल व्यवहार, आयटी सेवा आणि कॉल सेंटर्स (५० टक्के कर्मचारी), कुरिअर सेवा, आॅनलाइन शिक्षण, सरकारी कार्यालये, आॅनलाइन शिक्षण, फळे आणि फुले यासंबंधित प्रोसेसिंग, पॅकेजिंग, आयटी सुविधा देणारे कर्मचारी...यांच्यावरील निर्बंध कायमसिनेमागृहे, मॉल्स, जिम, स्विमिंग पूल थिएटर्स, स्पोर्ट्स सेंटर्स, हॉस्पिटॅलिटी सेवा, बार-परमिट रूम, सामाजिक, जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत रस्ते व प्रवास, रेल्वे आणि विमान प्रवासी वाहतूक, रिक्षा किंवा टॅक्सी सर्व्हिस, शाळा, महाविद्यालये आणि सर्व शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस.अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान करण्यासाठी शासनाने लॉकडाउनमधून काही उद्योग, व्यवसायांना सवलत देऊ केलेली आहे. याचा कोणताही गैरफायदा न घेता कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळती घेण्यासाठी शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. दिलेल्या सवलतीचा विश्वास सार्थ ठेवत नियमांचे पालन केले पाहिजे. ज्या उद्योग सेवांना आॅनलाइन परवानगी आवश्यक आहे त्यासाठी पोर्टल तयार केले जाईल. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी