शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

जिल्ह्यात विघ्नहर्ता बक्षीस योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:19 IST

पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, तो उत्साहपूर्वक व भक्तिभावाबरोबरच गणेश मंडळांमध्ये सामाजिक भावना निर्माण करण्यासह जातीय सलोखा टिकवणारा ठरावा, यासाठी नाशिकचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय दराडे यांनी गणेशोत्सव मंडळांसाठी ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’ जाहीर केली आहे.

सिन्नर : पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, तो उत्साहपूर्वक व भक्तिभावाबरोबरच गणेश मंडळांमध्ये सामाजिक भावना निर्माण करण्यासह जातीय सलोखा टिकवणारा ठरावा, यासाठी नाशिकचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय दराडे यांनी गणेशोत्सव मंडळांसाठी ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना’ जाहीर केली आहे.जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी विघ्नहर्ता बक्षीस योजना राबविली जाणार असून, तरुणांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सामाजिक एकोपा वृद्धिंगत होईल असे संदेश समाजात प्रसारित करावे या हेतूने पोलीस अधीक्षक दराडे यांच्या संकल्पनेतून आगामी गणेशोत्सवात आदर्श गणेश मंडळांची निवड करून त्यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या योजनेत्ांर्गत जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत व उपविभागीय स्तरावर ‘विघ्नहर्ता मंडळ परीक्षण समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. सदर समितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांचे पदाधिकाºयांची निवड करण्यात येणार आहे.या समितीमध्ये महिला सदस्यांचाही समावेश असेल. परीक्षण समिती हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन सजावट, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम, राष्टÑीय एकात्मतेवरील देखावे, बेटी बचाव, ग्रामस्वच्छता यावर अधारित देखावे किंवा उपक्रम राबविणाºया गणेश मंडळांना गुण देणार आहेत. जिल्हास्तरीय परीक्षण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक यांनी निवड केलेल्या पाच आदर्श गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समिती, पोलीसमित्र, प्रतिष्ठित नागरिक यांच्या बैठका घेण्याचे काम सुरूआहे. गणेशोत्सवादरम्यान मंडळांच्या मंडपातील साउंड सिस्टीम अथवा डीजेमुळे होणाºया ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक स्थापन करण्यात आले असून, नाईज मीटरचे साहाय्याने ध्वनीमर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवणाºया मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे.