शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

जिल्ह्याला बेमोसमीचा फटका

By admin | Updated: November 24, 2015 21:42 IST

आर्थिक पेच : नुकसानीने बळीराजा धास्तावला

नाशिक : गेल्या चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटात टाकले आहे. गेली अनेक वर्षे दुष्काळाशी सामना करताना नाकी नऊ आलेल्या शेतकऱ्याने थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसाचा आधार घेत कांद्याची रोपे, द्राक्ष, टमाटे लावून कर्जाचा डोंगर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बेमोसमी पावसाने या प्रयत्नावर पाणी फेरले आहे. कोनांबे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोनांबे परिसरात बेमोसमी पावसामुळे दैनंदिन फवारण्यांबरोबरच इतर फवारण्याही कराव्या लागत असल्याने उत्पादकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.पाऊस व ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा मारा वाढत आहे. फुलोरा असलेल्या द्राक्षबागांमध्ये घडकुज वाढत आहे. डावणी, भुरी यांसारख्या रोगांचा प्रतिकार करण्यासाठी आंतरप्रवाही व स्पर्शजन्य औषधांच्या अतिरिक्त फवारण्या कराव्या लागत आहे.द्राक्ष पीक सल्लागारांना संपर्क करूनच फवारणी करून आलेल्या संकटावर मात करण्याची धडपड सुरू असल्याचे द्राक्ष निर्यातदार दत्तात्रय डावरे यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे तीन-चार दिवस अगोदरच हवामानाचा अंदाज समजतो. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर येणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी हवामानाचा अंदाज घेऊन अगोदरच उपाययोजना करण्याचे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय संचालक बाजीराव डावरे यांनी केले आहे.खामखेडा परिसरात झालेल्या बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. परिसरात गेल्या दोन दिवसांपासूून अचानक वादळीवाऱ्यासह बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. शेतात उघड्यावर पडलेली मक्याची कणसे झाकण्यासाठी धांदल उडाली. तेव्हा शेतीसाठी बियाणे, खत यासाठी आणलेले पैसे कसे परत करावे याची चिंता बळीराजाला सतावत आहे. तेव्हा नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येऊन शासकीय स्तरावरून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.ओतूर : परिसरात गेल्या दोन दिवसांपासूून वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.सध्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे तर काही शेतकरी उन्हाळ नाशिक गावठी कांद्याची लागवड करीत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी लाल कांदा काढून शेतात ठेवला आहे तो पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे. तसेच उघड्यावर पडलेल्या मक्याचेही नुकसान झाले.इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद पूर्वभागातील भात व टमाटा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे याबाबतचे निवेदन आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिले आहे. तालुक्यात झालेल्या पावसाने भात पिकासोबत टमाट्याला हमीभाव मिळालाच पाहिजे व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.चांदवड तालुक्यातील खडकओझर लघुपाटबंधारे हा नाशिक पाटबंधारे विभागांतर्गत असून, सदरच्या तलावातील गाळ काढल्याने त्याची क्षमता वाढलेली आहे. सदरचा तलाव गेल्या दहा वर्षात प्रथमच पूर्ण भरलेला आहे. सदर तलावातील पाणी शेती सिंचनासाठी मिळावे यासाठी पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांनी उपसा योजनेच्या परवानग्या सन १९९१ ते १९९९ या दरम्यान घेतल्या आहेत व त्याच आजतागायत कायम आहे. या परवानग्या घेतल्यानंतर उपसा योजनेसाठी लागणारा विद्युत पुरवठा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून घेतलेला आहे. तसेच पाटबंधारे विभाग दरवर्षी पाणी वापराचा महसूल जमा करत आहे. जोपूळ व देवरगाव या गावासाठीची पिण्याच्या पाण्याची योजना सादर आहे. तरी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सोडून उर्वरित ल.पा. तलावातील पाणी हे सिंचनासाठी वापरण्यास मिळावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली. (लोकमत चमू)