डांगसौदाणे : जिल्हा परीषद शाळा डांगसौदाणे केंद्रात पटनोंदणी पंधरवडा या उपक्र मात विविध उपक्र म साजरे करण्यासाठी केंद्रप्रमुख हिरालाल बधान यांच्या मार्गदर्शनाखाली डांगसौंदाणे केंद्रातील सर्व शाळा व्यवस्थापनाच्या शाळेत मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होते.सन २०१९-२० साठी केंद्राचे घोषवाक्य ‘मशाल पेटवू, पट वाढवू’ ‘शिक्षणाचा ध्यास गुणवत्ता विकास’ हे होते. सहा ते चौदा वयोगटातील कोणतेही बालक शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर राहणार नाहीत. याची दक्षता घेत शिक्षकांनी सर्वेक्षण करून सर्व बालक शाळेत दाखल केली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.ट्रॅक्टर ,बैलगाडी, रिक्षा यात नवजात बालकांना बसून वाजत-गाजत शाळेत आणून गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येक शाळेत मोफत पाठ्यपुस्तकांचे त्याच दिवशी वितरण करण्यात आले. सर्व शाळांमध्ये पंधरवाडा यशस्वी साजरा करण्यासाठी गुलाब ठाकरे, कैलास बिरारी, भुषण पाटील, रवींद्र चौरे, मुरलीधर मुसळे, कुंदन चव्हाण, प्रदीप शेळके, सतीश मोरे, नंदकिशोर रौंदळ, राहुल भामरे, ज्ञानेश्वर देवरे, प्रवीण पाटील, पांडुरंग पाटील, नंदकिशोर पाटील, रमेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले. सदर कायक्रमाचे नियोजन केंद्रप्रमुख हिरालाल बधान यांनी शाळानिहाय केले होते.
जि. प. शाळा डांगसौदाणे केंद्रात पटनोंदणी पंधरवाडा उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 17:45 IST
डांगसौदाणे : जिल्हा परीषद शाळा डांगसौदाणे केंद्रात पटनोंदणी पंधरवडा या उपक्र मात विविध उपक्र म साजरे करण्यासाठी केंद्रप्रमुख हिरालाल बधान यांच्या मार्गदर्शनाखाली डांगसौंदाणे केंद्रातील सर्व शाळा व्यवस्थापनाच्या शाळेत मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
जि. प. शाळा डांगसौदाणे केंद्रात पटनोंदणी पंधरवाडा उपक्र म
ठळक मुद्देगावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.