ओझर : सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित हिंदुहृदयसम्राट जिल्हास्तरीय दोनदिवसीय कबड्डी स्पर्धा येथील नवीन इंग्रजी शाळेच्या क्रीडांगणावर संपन्न झाल्या. ओझर शहरात प्रथमच भरविण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने दोन्हीं मैदाने प्रेक्षकांनी भरगच्च भरली होती.अंतिम सामन्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस ३१ हजार रुपये व चषक ब्रम्हा आडगाव संघाने पटकावले. द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये व चषक पांढुर्ली स्पोर्ट्स क्लब आणि तृतीय पारितोषिक १५ हजार रुपये व चषक रुद्रा ब्राह्मणवाडे यांनी पटकावले. एकूण २० संघांनी सहभाग नोंदविला. उत्कृष्ट खेळाडू आकाश शिंदे, उत्कृष्ट चढाई विशाल वाजे यांना देखील रोख रक्कम व चषक देण्यात आले.
ओझर येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 23:41 IST
ओझर : सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित हिंदुहृदयसम्राट जिल्हास्तरीय दोनदिवसीय कबड्डी स्पर्धा येथील नवीन इंग्रजी शाळेच्या क्रीडांगणावर संपन्न झाल्या. ओझर शहरात प्रथमच भरविण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने दोन्हीं मैदाने प्रेक्षकांनी भरगच्च भरली होती.
ओझर येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा यशस्वी
ठळक मुद्देअंतिम सामन्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस ३१ हजार रुपये व चषक ब्रम्हा आडगाव संघाने पटकावले.