शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

जिल्ह्यासाठी दोन हजार क्विंटल तूरडाळ दाखल

By admin | Updated: August 20, 2016 01:42 IST

१०३ रुपये किलो : काळाबाजार रोखण्याचे आव्हान

 नाशिक : खुल्या बाजारात दोनशे रुपयांपर्यंत भाव पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली तूरडाळ रेशनमधून स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांसाठी पहिल्या टप्प्यात दोन हजार क्विंटल तूरडाळ दाखल झाली असून, येत्या आठवडाभरात रेशन दुकानांच्या माध्यमातून तिचे वाटप होणार आहे. (पान १० वर)सध्या सणासुदीचे दिवस असल्याने त्या पार्श्वभूमीवर खुल्या बाजारात तूरडाळ पुन्हा दोनशे रुपयांपर्यंत पोहोचल्याने गोरगरिबांनी वरण-भात खावा की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यमान राज्यकर्त्यांना नजीकच्या काळात तूरडाळ अडचणीत आणण्याची चिन्हे दिसत असतानाच शासनाने पात्र शिधापत्रिकाधारकांना रेशनवर स्वस्त दरात तूरडाळ देण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला. साखरेप्रमाणेच खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांकडून तूरडाळ खरेदी करून त्यांनीच थेट शासकीय धान्य गुदामापर्यंत ती पोहोचविण्यासाठी ठेके मागविण्यात आल्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील व्यापाऱ्याने १०३ रुपये दराने तूरडाळ पुरविण्याचे मान्य केले. नाशिक जिल्ह्यातील अन्नपूर्णा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे व अन्न सुरक्षा योजनेत पात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या चार लाख, ८० हजारांच्या आसपास असून, त्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे डाळ वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी जवळपास निम्मी म्हणजेच दोन हजार क्विंटल तूरडाळ जिल्ह्णात दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त डाळ अगोदर नाशिक व मालेगाव धान्य वितरण कार्यालय क्षेत्र, नाशिक तालुका या भागात वितरीत केली जाणार असून, पुढच्या आठवड्यात प्राप्त होणारी डाळ उर्वरित जिल्ह्यासाठी देण्यात येईल.