शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

्रजिल्हा परिषद शिक्षिकेने केली शासनाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:29 IST

नाशिक : अपंग लोकसेवकांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्याबाबतच्या शासनाच्या आदेशाचा फायदा घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने चक्क बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी वैशाली सुधाकर सोनवणे या शिक्षिकेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्देअपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र जिल्ह्यांतर्गत सोयीच्या बदलीचा प्रयत्न

नाशिक : अपंग लोकसेवकांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्याबाबतच्या शासनाच्या आदेशाचा फायदा घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने चक्क बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी वैशाली सुधाकर सोनवणे या शिक्षिकेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नाशिक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी किरण जयप्रकाश कुवर (४६, रा. अनमोल नयनतारा सिटी, तिडके कॉलनी, नाशिक) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिक तालुक्यातील मुंगसरे जिल्हा परिषद शाळेत वैशाली सुधाकर सोनवणे (रा. नाशिक) या शिक्षिका आहेत.त्यांनी सन २०१७ -१८ दरम्यान शासनाच्या जिल्ह्णांतर्गत बदलीसाठी आॅनलाइन अर्ज केला होता. अपंग लोकसेवकांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्याबाबत शासनाचे निर्देश असल्याने याचा फायदा घेण्यासाठी शिक्षिका सोनवणे यांनी जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडील अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र बनवून घेतले व ते जिल्ह्णांतर्गत बदलीसाठी आॅनलाइन अर्जाद्वारे शासनास सादर केले. पंचायत समितीने सोनवणे यांनी केलेल्या आॅनलाइन अर्जातील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे समोर आले़ त्यामुळे गटशिक्षण अधिकारी कुंवर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सोनवणे यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.