शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जिल्हा बॅँकेची अंतिम प्रारूप यादीला मुहूर्त

By admin | Updated: April 10, 2015 23:58 IST

४६३३ एकूण मतदार

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची असलेली स्थगिती उठल्यानंतर दोन दिवसांनी काल(दि.१०)रात्री उशिरा जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक एम. ए. आरीफ यांनी जिल्हा बॅँकेची अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध केली. अ गटात १०५३, तर ब गटात ३९८० असे एकूण ४६३३ एकूण मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.दरम्यान, दोन दिवस उलटूनही विभागीय सहनिबंधक कार्यालयाला उच्च न्यायालयाचे आदेशच प्राप्त होत नसल्याचे कारण सांगण्यात येत असून, मागील दाराने या दोन दिवसांत जिल्हा बॅँक मतदार यादीत काही दुरुस्ती करण्यात येत असल्याबाबत चर्चा होती.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आधी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २५ मार्च रोजीच जिल्हा बॅँकेच्या सभासद मतदारांची अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, त्या यादीवर डॉ. गिरीश मोहिते यांच्यासह अन्य दोघांनी हरकत घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बुधवारी (दि. ८) मुंबई उच्च न्यायालयात द्विसदस्यीय न्या. गवई व न्या. गडकरी यांच्या खंडपीठासमोर या तीनही याचिकांवर सुनावणी होऊन तीनही याचिका फेटाळण्यात आल्या होत्या. न्यायालयाने अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास दिलेली स्थगिती उठविल्याने जिल्हा सहकार निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या वतीने अंतिम करण्यात आलेली मतदारांची प्रारूप यादी गुरुवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता होती. मात्र, शुक्रवारी सायंकाळपर्यंत उच्च न्यायालयाचे  लेखी आदेश प्राप्त न झाल्याने अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास अडचण असल्याचे चित्र उभे करण्यात आले. त्यानंतर मुंबईला सरकारी अभियोक्त्यांकडून कार्यालयाने मार्गदर्शन मागविल्यानंतर यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय झाल्याची माहिती विभागीय उप निबंधक सतीश खरे यांनी दिली. त्यानंतर रात्री उशिरा विभागीय सहनिबंधक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात ही अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे लवकरच जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची चिन्हे आहेत.(प्रतिनिधी)