शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेला मिळणार निधी

By admin | Updated: April 20, 2017 00:26 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची आर्थिक परिस्थिती येत्या दोन-तीन दिवसांत पूर्व पदावर येण्याची चिन्हे आहे.

 नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची आर्थिक परिस्थिती येत्या दोन-तीन दिवसांत पूर्व पदावर येण्याची चिन्हे असून, बुधवारी (दि. १९) मुंबईत जिल्"ाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची बॅँकेच्या संचालक मंडळाने भेट घेऊन राज्य शिखर बॅँकेच्या निधीबाबत चर्चा केली. येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हा बॅँकेला राज्य शिखर बॅँकेकडून निधी उपलब्ध करून देण्यास शासन निर्देशित करेल, असे आश्वासन यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे समजते.दरम्यान, राज्य शिखर बॅँकेची गुरुवारी (दि. २०) मुंबईत याच कारणाने तातडीची बैठक आयोेजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे संचालक तथा प्रवक्ते परवेज कोकणी यांनी दिली.बुधवारी (दि. १९) जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह बॅँकेचे संचालक शिरीषकुमार कोतवाल, परवेज कोकणी, अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, गणपतराव पाटील, आमदार सीमा हिरे यांच्यासह संचालकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत कल्पना दिल्याचे कळते. नोटाबंदीनंतरच्या काळात जमा झालेल्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्यानंतर राज्य शिखर बॅँकेकडे जिल्हा बॅँकेच्या ठेवींच्या स्वरूपात असलेल्या ५४० कोटींपैकी २३० कोटी अद्याप बाकी असून, ही रक्कम रोख तरलता म्हणून स्वीकारण्यास मान्यता मिळाली नसल्याने जिल्हा बॅँकेने यातील किमान १०० कोटींचा निधी तत्काळ मिळावा यासाठी ठराव संमत केला असून, तसा प्रस्ताव राज्य शिखर बॅँकेकडे पाठविल्याचे शिष्टमंडळाने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजते. त्यामुळे राज्य शिखर बॅँकेला शासन जिल्हा बॅँकेला निधी उपलब्ध करून देण्याबाबत तत्काळ आदेश देईल, अशी ग्वाही गिरीश महाजन यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती येत्या दोन-तीन दिवसांत पूर्व पदावर येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)