शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुली थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 18:32 IST

गेल्या दोन वर्षांपासून असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती, अशातच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे अगोदरच शेतकरी पिचलेला, वैतागलेला असताना ऐन हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकºयांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून, शेतकरी संघटनेने ही कर्ज वसुलीची प्रक्रि या त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन सहायक निबंधक यांना दिले आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यातील शेतकऱ्यांची सहायक निबंधकांकडे मागणी

येवला : गेल्या दोन वर्षांपासून असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती, अशातच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे अगोदरच शेतकरी पिचलेला, वैतागलेला असताना ऐन हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकºयांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून, शेतकरी संघटनेने ही कर्ज वसुलीची प्रक्रि या त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन सहायक निबंधक यांना दिले आहे.सध्या खरीप हंगामावर पावसाच्या अवकृपेमुळे संकटाचे सावट असताना जिल्हा बँकेने तालुक्यातील शेतकºयांना थकीत पीककर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. सहायक निबंधकांमार्फत या नोटीस शेतकºयांना चालू महिन्यात प्राप्त झालेल्या आहेत. एकीकडे जिल्हा बँकेने शेतकºयांना नोटाबंदीनंतर पीककर्जाचे वाटप केले नाही, तर दुसरीकडे शेतकरी कौटुंबिक समस्यांना तोंड देत दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींनाही सामोरे जात आहे. जिल्हा बँकेने सहकारी साखर कारखाना, संचालकांच्या विविध सहकारी संस्थांना मनमानी कर्जाचे वाटप करून आज ही कर्जे थकीत असताना त्या कर्जाची वसुली सोडून शेतकºयांच्या मागे बँक हात धुवून थकीत कर्ज वसुलीसाठी लागली आहे. सदरच्या वाटलेल्या कर्जामुळेच जिल्हा बँक आज डबघाईस आलेली आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रात अनेक शेतकºयांनी थकीत कर्जापोटी आत्महत्या केलेल्या असताना जिल्हा बँकेने शेतकºयांना नोटिसा पाठविण्यापूर्वी विचार करावयास हवा होता, असेही शेतकरी संघटनेने सहायक निबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्या खरीप हंगामात अनेक ठिकाणी शेतकºयांना पावसाअभावी दुबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत, शेतकरी संकटात असताना कर्जदार सभासदांना सक्तीची कर्ज वसुली राबवून त्यास जप्तीची, लिलावाची भीती दाखवून त्रास दिला जात आहे.शेतकºयांनी घेतलेल्या पीककर्जाचा यापूर्वीही वेळेवर भरणा केलेला आहे; मात्र सलगच्या दुष्काळामुळे तसेच शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी पीककर्ज भरू शकलेला नाही हे बँकेने लक्षात घेऊन सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संध्या पगारे, सुभाष सोनवणे, अनिस पटेल, अरु ण जाधव, शिवाजी वाघ, सुरेश जेजुरकर, सुरेश कदम, बापूसाहेब पगारे आदींनी केली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक