शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेचे विलीनीकरण ‘अवघड’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:03 IST

राज्य सरकारने अडचणीत असलेल्या राज्यातील तब्बल १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांचे विलीनीकरण करण्याबाबत विचार सुरू केला आहे. या बारा जिल्हा बॅँकांमध्ये नाशिक जिल्हा बॅँकेचाही समावेश असल्याने संचालक मंडळ हादरले आहे. मात्र तांत्रिक बाबींचा विचार करता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे राज्य शिखर बॅँकेत विलीनीकरण होणे तांत्रिकदृष्ट्या अवघड बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नाशिक : राज्य सरकारने अडचणीत असलेल्या राज्यातील तब्बल १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांचे विलीनीकरण करण्याबाबत विचार सुरू केला आहे. या बारा जिल्हा बॅँकांमध्ये नाशिक जिल्हा बॅँकेचाही समावेश असल्याने संचालक मंडळ हादरले आहे. मात्र तांत्रिक बाबींचा विचार करता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे राज्य शिखर बॅँकेत विलीनीकरण होणे तांत्रिकदृष्ट्या अवघड बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.  या समितीत नाबार्ड, राज्य शिखर बॅँकेसह राज्याच्या सहकार खात्याचे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी समाविष्ट आहेत. या समितीला राज्यातील सर्व बारा जिल्हा बॅँकांची प्रत्यक्ष जाऊन तपासणी करून अभ्यास करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.  समितीतर्फे सादर होणाºया अहवालात त्या बॅँकांची आर्थिक स्थिती, बॅँकांच्या विलीनीकरणानंतर राज्य शिखर बॅँकेवर येऊ पाहणारा आर्थिक ताण, काही बॅँकांची आर्थिक परिस्थिती सुदृढ असल्यास त्याबाबतची कारणे, संबंधित जिल्हा बॅँकांवर अवलंबून असणारे साखर कारखाने व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची परिस्थिती, जिल्हा बॅँकेत कार्यरत असलेले कर्मचारी व अधिकारी यांच्या विलीनीकरणानंतरच्या कामकाजाबाबत व त्यांच्या वेतनाबाबतचा आर्थिक भार यांसह अनेक तांत्रिक व आर्थिक बाबींचा विचार करूनच या समितीला संबंधित १२ जिल्हा बॅँकांविषयी अहवाल सादर करायचा आहे.  नाशिक जिल्हा बॅँकेचा विचार करता २१३ शाखा, कर्मचारी व अधिकारी संख्या, एकूण ठेवी, बॅँकेची एकूण मालमत्ता यांसह अन्य बाबींचा विचार करता नाशिक जिल्हा बॅँकेचे राज्य शिखर बॅँकेत विलीनीकरण करणे तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या अवघड असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका समितीची स्थापनाच्नाशिकसह राज्यातील बारा जिल्हा बॅँका आर्थिक अडचणीत असल्याचे कारण देत त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारने या बारा बॅँकांचे राज्य शिखर बॅँकेत विलीनीकरण करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे.  च्या तीन महिन्यांत या समितीला संबंधित जिल्हा बॅँकांच्या आर्थिक परिस्थितीबाबत अभ्यास करून नंतरच अहवाल सादर करायचा आहे.च्आता मात्र सहकार विभागाने याबाबत यू टर्न  घेतला आहे.