शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक : योजनेपासून वंचित राहण्याची भीती कर्जमाफीसाठी ४७ हजार शेतकºयांची माहिती जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:10 IST

नाशिक : आॅनलाइन भरलेल्या माहितीचा ताळमेळ बसत नसल्याने ४७ हजार शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात असून, जिल्हा बॅँकेने या संदर्भात केलेल्या आवाहनाला फक्त तीन हजार शेतकºयांचा प्रतिसाद मिळाला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांकडून आॅनलाइन कर्जमाफीचे अर्ज भरून घेतलेकर्जखात्यााात पैसे भरून सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न

नाशिक : जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज घेताना खातेदाराने बॅँकेला दिलेली माहिती व शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत आॅनलाइन भरलेल्या माहितीचा ताळमेळ बसत नसल्याने जिल्ह्णातील जवळपास ४७ हजार शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात असून, जिल्हा बॅँकेने या संदर्भात केलेल्या आवाहनाला फक्त तीन हजार शेतकºयांचा प्रतिसाद मिळाला आहे.राज्य सरकारने जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजना जाहीर करून आॅगस्ट महिन्यापासून शेतकºयांकडून आॅनलाइन कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले. या अर्जात जवळपास ५५ प्रकारचे प्रश्न विचारून शेतकºयाची व त्याच्या कुटुंबीयांची इत्यंभुत माहिती शासनाने भरून घेतली व त्याची खात्री पटल्यानंतरच त्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्जमाफ केले. प्रत्यक्षात शेतकºयाच्या हातात कर्जमाफीची रक्कम न देता जिल्हा बॅँकेच्या त्याच्या कर्जखात्यााात पैसे भरून सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न केला.जवळपास ५०,३३३ शेतकºयांना शासनाने अपात्र ठरवून त्यांची यादी पुन्हा जिल्हा बॅँकेकडे जानेवारी महिन्यात परत पाठविली व शेतकºयांनी भरलेली चुकीच्या माहितीची दुरुस्ती करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने कर्जदार पत्नी असता पतीने अर्ज भरणे, आधार क्रमांक नसणे, भ्रमणध्वनी क्रमांक न देणे, कर्जाची रक्कम चुकणे, त्याचबरोबर २०१७ पर्यंतच्या कर्जाचा उल्लेख करणे अशा प्रकारच्या चुका असल्याने जिल्हा बॅँकेने सदरची यादी बॅँकेच्या प्रत्येक शाखेत पाठवून त्या त्या शेतकºयांनी त्याची पूर्तता करण्याचे आवाहन केले. परंतु बॅँकेच्या या आवाहनाला फक्त तीन हजार शेतकºयांना प्रतिसाद मिळाला. याचाच अर्थ शेतकºयांनी चुकीचे अर्ज भरले असून खरी माहिती दडविली असावी असे बॅँक व्यवस्थापनाला वाटू लागले आहे. त्यामुळे जवळपास ४७ हजार शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून आता वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.